महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) हे त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे कायम चर्चेत असतात. सध्या त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याप्रकरणी ते चर्चेत आहेत. ‘शिवाजी महाराज तर जुने युगाचे हिरो, डॉ. आंबेडकरांपासून तर डॉ. गडकरीपर्यंत नव्या युगाचे हिरो असल्याचे भगतसिंग कोश्यारी होते. त्यांच्या या वक्तव्याचा जोरदार निषेध होत आहे. यावर अनेक स्तरातून प्रतिक्रिया देखील येत आहेत.
महत्वाची बातमी! बारामतीतून वैदयकीय कॉलेज महिला रुग्णालयासाठी बससेवा सुरु
यांच्यावर होणाऱ्या निषेधामुळे ते अडचणीत सापडले आहेत. आता त्यांच्या या अडचणीत अजून वाढ झाली असून, यांच्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. भगतसिंग कोश्यारी यांना राज्यपाल पदावरुन हटवा अशी याचिका देखील दाखल करण्यात आली आहे.
पापा च्या परीने दिली तरुणाच्या बाईकला धडक; परंतु, माफी न मागताच….
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग जनतेमधील शांतात भंग केल्याचा आरोप या चिकेमध्ये दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर भारतीय राज्यघटनेच्या (Constitution of India) अनुच्छेद ६१ आणि १५६ अंतर्गत कारवाई (action) करावी अशी मागणी देखील केली जात आहे.
शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे श्रीगोंदा तहसील कार्यलयासमोर धरने आंदोलन