एकनाथ शिंदेंच्या सातारा दौऱ्यावरील संकट टळले; राजू शेट्टींनी घेतली नमती भूमिका

Crisis on Eknath Shinde's Satara tour averted; Raju Shetty played the role of Namati
pc – facebook

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी हे नेहमी आक्रमक भूमिका घेत असतात. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या होणाऱ्या पिळवणूकिवरून मागील काही दिवसांत राज्यात विविध ठिकाणी आंदोलने (Strike) सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर ऊसदर वाढविण्यात यावा व इतर महत्त्वाच्या मागण्यांसाठी काल (दि. २५) राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन होणार होते. राजू शेट्टी यांनी या आंदोलनाचा इशारा दिला होता. परंतु, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आजचा सातारा दौरा (Eknath Shinde Satara Visit program) यामुळे फिस्कटण्याची दाट शक्यता होती.

दरम्यान, हा दौरा व्यवस्थित व्हावा. या हेतूने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजू शेट्टी यांच्यासोबत बैठक घेऊन चर्चा केली. या चर्चेनंतर राजू शेट्टी यांनी आंदोलन मागे घेतल्याचे पहायला मिळत आहे. तसेच राज्याच्या सहकार मंत्र्यांनी या विषयी बोलण्यासाठी राजू शेट्टी ( Raju Shetti) यांना मुंबई भेटीचे आमंत्रण दिले आहे. येत्या मंगळवारी ( दि. 29) ही बैठक होणार आहे. यामुळे माजी खासदार राजू शेट्टी यांनी आपला आंदोलनाचा विचार सध्या तरी थांबवला आहे.

मुंबईमध्ये सहकार मंत्र्यांशी होणाऱ्या बैठकीत सकारात्मक निर्णय येईल अशी आशा राजू शेट्टी यांना आहे. यासाठी त्यांनी आंदोलनाचा कार्यक्रम होल्डवर ठेवलाय. परंतु, मुंबई मधील बैठक ( Mumbai meeting ) सकारात्मक न झाल्यास येत्या 30 नोव्हेंबरपासून महाराष्ट्रात राज्यव्यापी आंदोलन होईल. असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *