राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे आमदारांसह आज गुवाहाटीसाठी निघाले आहेत. गुवाहाटीला महाराष्ट्रातील राजकीय भुकंपाचे केंद्र बिंदू मानले जात आहे. माहितीनुसार गुवाहाटीतील प्रसिद्ध कामाख्या देवी मंदिरात ते विशेष पूजा देखील करण्यात येणार आहे. यामध्येच आता आमदार रोहित पवार यांनी शिंदे गटाच्या आधीच महाराष्ट्रासाठी आणि शिंदे गटातील आमदारांसाठी कामाख्या देवीला प्रार्थना केली आहे. याबाबत रोहित पवारांनी ट्विट केले आहे.
मोठी बातमी! एकनाथ शिंदे आज आमदारांसह गुवाहाटीला रवाना
रोहित पवार म्हणाले, “हे माता कामाख्या देवी.. राज्यातील सामान्य माणसांच्यावतीने तुला प्रार्थना! सत्ता’बदला’साठी तू आशिर्वाद दिला पण आता बदल्याची भाषा थांबावी..राज्याचे उद्योग गुजरातने पळवू नये..युवांच्या नोकरीचा घास हिरावला जाऊ नये..महाराष्ट्राची बदनामी सहन करू नये..वाचाळ मंत्र्यांना तारतम्य यावं”.
हे माता कामाख्या देवी..
— Rohit Pawar (@RRPSpeaks) November 26, 2022
राज्यातील सामान्य माणसांच्यावतीने तुला प्रार्थना!
सत्ता'बदला'साठी तू आशिर्वाद दिला पण आता बदल्याची भाषा थांबावी..
राज्याचे उद्योग गुजरातने पळवू नये..
युवांच्या नोकरीचा घास हिरावला जाऊ नये..
महाराष्ट्राची बदनामी सहन करू नये..
वाचाळ मंत्र्यांना तारतम्य यावं, pic.twitter.com/YYuC39W6um
शिंदे गट गुवाहाटीला कोणाचा बळी द्यायला चालले काय माहित? – अजित पवार
दरम्यान, जून 2022 एकनाथ शिंदे आणि काही आमदार घेऊन गुवाहाटीला शिवसेनेविरुद्ध (Shivsena)बंड करण्यासाठी आणि उद्धव ठाकरेंचे महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी गेले होते. नंतर राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आणि आता त्यांचे सरकार असून ते मुख्यमंत्री झाले आहेत. आता एकनाथ शिंदे पुन्हा गुवाहाटीला जाऊन देवीचे दर्शन घेणार आहेत.
“अमृता फडणवीस 100 वर्ष म्हाताऱ्या होणार नाहीत”, रामदेव बाबांचे विधान चर्चेत