मुंबई : मागच्या काही दिवसांपासून अभिनेता रणवीर सिंग (Ranveer Singh) त्याच्या न्यूड फोटोशूटमुळे सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. सोशल मीडियावर काही लोक रणवीरला ट्रोल करत आहेत तर काही लोक अभिनेत्याला पाठिंबा देत आहेत. आत्तापर्यंत अनेक कलाकारांनी रणवीरला पाठिंबा दिला आहे. आता यामध्ये जानव्ही कपूरने (Janhvi Kapoor) देखील रणवीरच्या फोटोशूटवर प्रतिक्रिया देत पाठिंबा दिला आहे.
एका कार्यक्रमामध्ये जानव्ही कपूरला रणवीर सिंगच्या बोल्ड फोटोबद्दल प्रश्न विचारण्यात आला. यावेळी उत्तर देत अभिनेत्री म्हणाली, ‘मला वाटतं हे एक कलात्मक स्वातंत्र्य आहे आणि कोणालाही त्यांच्या कलात्मक स्वातंत्र्याची शिक्षा मिळावी असं मला अजिबात वाटत नाही.’
रणवीर सिंगच्या न्यूड फोटोशूबद्दल अनेक कलाकारांनी त्याला पाठिंबा दिला. दिव्या बालनने देखील यावर प्रतिक्रिया दिली होती. ती म्हणाली, “ज्यांनी रणवीरवर खटला दाखल केला त्यांच्याकडे कदाचित काम नसेल, म्हणून ते आपला वेळ यावर वाया घालवत आहेत. तुम्हाला हे फोटोशूट आवडत नसल्यास, तुम्ही पाहू नका किंवा त्याबद्दल वाचू नका. पण गुन्हा दाखल करून एखाद्याच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर तुम्ही प्रश्नचिन्ह उपस्थित करू शकत नाही.