मागच्या काही दिवसांपूर्वी राज्यपाल (Governor) भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत एक वक्तव्य केले होते. आता यामध्येच राज्यपाल कोश्यारी यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ काँग्रेसने (Congress) अपलोड करून २६/११च्या मुंबई हल्ल्यामधील हुतात्म्यांचा अपमान केल्याचा दावा केला आहे. आता यामुळे वातावरण चांगलेच तापले असून नेते संभाजीराजे भोसले यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
शरद पवारांच्या खास जवळच्या व्यक्तीनेच सोडला पक्ष
संभाजीराजे भोसले (Sambhaji Raje Bhosale) यांनी याबाबत एक ट्विट केले. ट्विट करत त्यांनी लिहिले की “भगतसिंग कोश्यारी यांच्यावर अजूनही कोणती कारवाई झालेली नाही. कारवाई होत नाही याचा अर्थ त्यांनी केलेल्या विधानांशी राज्यकर्ते सहमत आहेत का? महाराष्ट्राच्या जनतेला कुणीही गृहीत धरू नये. शिवभक्तांच्या भावना सरकारला समजत नसतील तर उठाव होणारच!”.
गाई-म्हशीच्या दुधापेक्षा फायदेशीर ठरतंय शेळीचं दूध; ‘हे’ आहेत फायदे
भगतसिंग कोश्यारी यांच्यावर अजूनही कोणती कारवाई झालेली नाही. कारवाई होत नाही याचा अर्थ त्यांनी केलेल्या विधानांशी राज्यकर्ते सहमत आहेत का ? महाराष्ट्राच्या जनतेला कुणीही गृहीत धरू नये. शिवभक्तांच्या भावना सरकारला समजत नसतील तर उठाव होणारच !#कोश्यारी_हटाओ
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) November 27, 2022
दरम्यान, त्यांचे हे ट्विट सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. आता या ट्विटवर अनेक वेगीवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत.