राज्यपाल (Governor) कोश्यारींनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबतच्या एक वादग्रस्त विधान केले आहे. ‘शिवाजी महाराज तर जुने युगाचे हिरो, डॉ. आंबेडकरांपासून तर डॉ. गडकरीपर्यंत नव्या युगाचे हिरो असल्याचे भगतसिंग कोश्यारी म्हणाले आहेत .छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासंबधी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी राज्यातील राजकारण तापले आहे. यामध्येच आता खासदार उदयनराजे भोसले यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
“करायला गेला एक आणि झालं भलतंच”; मोराची अंडी चोरणाऱ्या माणसाचा व्हिडीओ तुम्ही पाहिलाय का?
खासदार उदयनराजे भोसले यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी कोश्यारी यांच्यावर पुन्हा निशाणा साधलाय. यावेळी उदयनराजे भावुक झाल्याचे पाहायला मिळाले. त्यांनी “मेलो असतो तर बर झालं असतं”. अशी भावना देखील व्यक्त केली आहे.
“अरे गधड्या तुझी लायकी…”; राज ठाकरेंची राहुल गांधींवर जहरी टीका
‘राजकीय स्वार्थासाठी शिवरायांचा वापर केला जातोय, असा आरोप देखील त्यांनी यावेळी केला आहे. त्याचबरोबर ते पुढे म्हणले, ” छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल गलिच्छ प्रतिमा तयार केली जाते तेव्हा राग कसा काय येत नाही. जनतेने यावर विचार करणे गरजेचे आहे. असं देखील ते म्हणाले आहेत.
भाजपला धक्का! गुजरात निवडणुकीच्या तोंडावर ‘या’ मंत्र्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश