राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यांनंतर त्यांच्या या वक्तव्यामुळे त्यांना पदावरुन लवकरात लवकर हटवण्याची मागणी होत आहे. यामध्येच आता राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी एक वक्तव्य केले आहे. सध्या त्यांचे वक्तव्य खूप चर्चेत आहे.
पत्रकार परिषदेत उदयनराजे भावुक; म्हणाले, ‘मेलो असतो तर बर झालं असतं..’
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी त्यांना स्वतःलाच पद नको असल्याचं त्यांनी त्यांच्या निकटवर्तियांना सांगितलं आहे. अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. कोश्यारी यांनी आपल्या निकटवर्तीयांकडे ही भावना व्यक्त केल्याची माहिती समोर येतं आहे. त्यामुळे राजकीय वातावरणात चर्चाना उधाण आले आहे.
“करायला गेला एक आणि झालं भलतंच”; मोराची अंडी चोरणाऱ्या माणसाचा व्हिडीओ तुम्ही पाहिलाय का?
दरम्यान, शिवाजी महाराजांची तुलना शरद पवार आणि नितीन गडकरी यांच्यासोबत केल्याने राज्यपालांविरोधात महाविकास आघाडी आक्रमक झाली आहे. सरकारने यावर तात्काळ भूमिका घेऊन राज्यपालांची हकालपट्टी करावी, अशी मागणी शिवसेनेने लावून धरली आहे.
“अरे गधड्या तुझी लायकी…”; राज ठाकरेंची राहुल गांधींवर जहरी टीका