लावणी कलाकार गौतमी पाटील ( Gaurtami Patil) मागील काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. तिची नृत्य करण्याची पद्धत अश्लील असल्याचा आरोप सगळीकडून होत आहे. साडी नेसण्याची पद्धत, अश्लील हातवारे यामुळे गौतमी मोठ्या प्रमाणात टीकेचे लक्ष्य बनत आहे. या पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सुद्धा आपले मत व्यक्त केले आहे.
दिलासादायक! ‘या’ बाजार समितीत कांद्याला मिळाला ३५०० रुपये दर
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकारिणी सदस्यांनी गौतमी विरुद्ध आक्रमक भूमिका घेतली आहे. गौतमी पाटीलच्या विरुद्ध IPC ऍक्ट प्रमाणे कलम 509 दाखल करावा. ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या महाराष्ट्रात सुरू असलेला हा अश्लील नाच गृहमंत्रालयाने तात्काळ बंद करावा. असे न झाल्यास गृहमंत्रालयाच्या काचा फोडण्यास देखील मागेपुढे बघणार नाही असा इशारा मनसे कडून देण्यात आला आहे.
गोवरबद्दल केंद्रीय आरोग्य विभागाने दिली ‘ही’ महत्वाची माहिती; वाचा सविस्तर
दरम्यान मनसे चे कार्यकारिणी सदस्य सिद्धेश्वर काकडे यांनी, गौतमीवर कारवाई करा असे सांगणारे पत्र मुंबई पोलीस महासंचालकांना लिहिले आहे. गौतमीचे अश्लील नृत्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल ( Gautami Patil Dance Video) होत आहेत. यामुळे महाराष्ट्रात चुकीचे वातावरण तयार होत आहे. याचे गंभीर व वाईट परिणाम महाराष्ट्रातील तरुणाईवर होऊ शकतात. यामुळे गौतमी पाटील वर कठोर कारवाई व्हावी असे या पत्रात सांगण्यात आले आहे.
संजय राऊतांच्या अडचणीत पुन्हा वाढ, प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश