मुंबई : एकनाथ शिंदेंनी (Eknath shinde) बंडखोरी करत भाजपाच्या मदतीने मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे तर उपमुख्यमंत्री पद देवेंद्र फडणवीस यांना मिळाले. शिवसेनेत झालेल्या बंडखोरीमुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला.
एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन महिन्याहून अधिक कालावधी झाला असून ( Eknath Shinde) राज्यात अद्याप मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. यामुळे अनेक नेत्यांकडून शिंदे फडणवीस सरकारवर जोरदार टीका करण्यात येत आहे.
16 आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर 12 ऑगस्ट रोजी सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. याआधीच मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. राज्यात होणाऱ्या जोरदार पाऊसामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. अश्या परिस्थितीत मंत्रिमंडळ विस्तार झाला नसल्याने सरकारवर जोरदार टीका करण्यात येत आहे. यामुळेच जनतेचे सगळे प्रश्न मार्गी लागण्यासाठी उद्या सकाळी मंत्रिमंडळ विस्तार होऊन शपथविधी पार पडणार आहे.
चंद्रकातं पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, राधाकृष्म विखे पाटील, बबनराव लोणीकर, गणेश नाईक, प्रवीण दरेकर, रवींद्र चव्हाण, आशिष शेलार, नितेश राणे यांची नावे भाजपमधून मंत्रिमंडळ विस्तारासाठी चर्चेत आहेत.
तर मंत्रिमंडळ विस्तारासाठी दीपक केसरकर, उदय सामंत, दादा भुसे, गुलाबराव पाटील, शंभूराजे देसाई, अब्दुल सत्तार, संजय शिरसाट, संदीपान भुमरे, भरत गोगावले तसेच अपक्षांतून बच्चू कडू, राजेंद्र पाटील येड्रावकर या शिंदे गटातील नावांची चर्चा होत आहे.