शिवाजी महाराज म्हणजे अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत आज राज्यात शिवप्रताप दिन उत्साहात साजरा झाला. या पार्श्वभूमीवर विविध ठिकाणी कार्यक्रम देखील घेण्यात आले होते. दरम्यान शिवाजी महाराजांचे थेट वंशज सातारचे छत्रपती उदयनराजे भोसले ( Udayanraje Bhosale) यांनी पत्रकार परिषदेत ‘छत्रपती शिवाजी महाराजांनी आपला देश आणि संपूर्ण जगाला लोकशाहीचा पाया घालून दिला’ असल्याचे मोठे वक्तव्य केले आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि भाजपचे प्रवक्ते सुधांषु त्रिपाठी यांच्यावर छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल कारवाई व्हावी, या मुद्द्यावर ही पत्रकार परिषद घेण्यात आली होती.
बिग ब्रेकिंग! रवीश कुमार यांचा एनडीटीव्हीला रामराम
जगभरातील विविध देशांमध्ये आजदेखील राजेशाही राजवट आहे. महाराजांच्या मनात असते तर आजही भारतात राजेशाही असती. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्यकारभारात लोकांचा समावेश व्हावा, विविध जाती धर्मातील लोकांना न्याय मिळावा, त्यांना प्रतिनिधित्व करता यावे यासाठी अष्टप्रधान मंडळाची स्थापना केली. त्यामुळेच आज भारतात लोकशाही आहे. जगभरात भारताकडे सर्वात मोठी लोकशाही (Democracy) म्हणून पाहिलं जात. मात्र महाराजांच्या विचारांचा विसर पडला तर काय होईल? असे खासदार उदयनराजे म्हणाले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी ११ डिसेंबरला महाराष्ट्र दौऱ्यावर
याशिवाय शिवाजी महाराजांच्या जयंतीबद्दल बोलताना त्यांनी थेट हल्लाबोल केला आहे. यावेळी ते म्हणाले की, “महाराष्ट्रात सध्या तीन वेळा शिवजयंती साजरी केली जाते. ही महाराजांची अवहेलना असून फक्त श्रेय वादासाठी शिवजयंती साजरी करत असतील तर मला काही बोलायचे नाही.” तसेच सर्वधर्म समभावाची व्याख्या आता बदलली आहे का ? असा प्रश्न देखील उदयन महाराजांनी यावेळी उपस्थित केला.
बिग ब्रेकिंग! ज्येष्ठ साहित्यिक समीक्षक नागनाथ कोत्तापल्ले याचे निधन