मुंबई : आदित्य ठाकरेंनी पत्रकार परिषद आयोजित करून सरकारवर हल्लाबोल केला आहे. यावेळी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, “ज्यावेळी आम्ही आंदोलन करतो तेव्हा शेमडी पोरं म्हणतात. शेतकऱ्याच्या नुकसानीचे पंचनामे देखील अजून झालेले नाहीत, त्यामुळे नुकसानभरपाई पोहचण्याचा प्रश्नच नाही. असं आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले आहेत.
उदयनमहाराजांचा हल्लाबोल; म्हणाले,”… ही महाराजांची अवहेलना नाही का?”
त्याचबरोबर गुजरातमध्ये गेलेल्या वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पावरून देखील आदित्य ठाकरेंनी शिंदे-फडणवीस सरकारला लक्ष केलं आहे. आदित्य ठाकरे म्हणाले, वेदांता फॉक्सकॉन गुजरातमध्ये गेला याचं वाईट वाटत नाही. पण इथल्या लाखो तरुणांचा रोजगार गेला आहे. असं देखील यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी ११ डिसेंबरला महाराष्ट्र दौऱ्यावर
त्याचबरोबर आदित्य ठाकरे पुढे म्हणाले, उद्योगमंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री तर यावर विषयावर बोलतच नाहीत. माझं त्यांना खुलं आव्हान आहे की, त्यांनी माध्यमांसमोर माझ्यासोबत या सर्व विषयांवर चर्चा करावी.