मुंबई: उद्धव ठाकरेंनी मुंबईमध्ये (Mumbai) एका कार्यक्रमात राज्याला पहिली महिला मुख्यमंत्री देणार असं विधान केलं आहे. सध्या उद्धव ठाकरे यांच्या या विधानामुळे चर्चाना उधाण आले आहे. राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.
शिंदे-फडणवीस सरकार अखेर शेतकऱ्यांना पावले; मंत्रिमंडळ बैठकीत घेतले ‘हे’ मोठे निर्णय
मुंबईमध्ये कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी महाराष्ट्राच्या राजकीय रणसंग्रामासाठी रणशिंग फुंकलं आहे. ठाकरे गटाचे चिन्ह म्हणून आम्हाला जाळणारी मशाल मिळाली आहे. ही मशाल आम्ही अंधकार दूर करण्यासाठी वापरू, असं देखील उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले आहे.
आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना चॅलेंज; म्हणाले, “माध्यमांसमोर माझ्याशी चर्चा करून दाखवावी”
दरम्यान, काल मुंबईमध्ये लहुजी वस्ताद साळे यांच्या 228 व्या जयंतीचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमावेळी उद्धव ठाकरे उपस्थिती होती. उद्धव ठाकरे म्हणाले की, आपण सर्वजण राज्याचं रक्षण करण्यासाठी एकत्र येऊ, शिवशक्ती, भीमशक्ती आणि लहू शक्ती एकत्र आली तर देशामध्ये एक मोठी ताकद आपण उभी करू शकतो. असं देखील उद्धव ठाकरे यावेळी बोलताना म्हणाले आहेत.
उदयनमहाराजांचा हल्लाबोल; म्हणाले,”… ही महाराजांची अवहेलना नाही का?”