मुंबई: आजकाल प्रत्येक घरी स्वयंपाक करण्यासाठी गॅस सिलिंडर वापरतात. या गॅस सिलिंडरच्या दरात कायम चढ-उतार होत असतात. त्यामुळे ग्राहक कायम चिंतेत असतात. प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला LPG गॅस सिलिंडरच्या किंमती जाहीर करतात. आजसुद्धा इंधन कंपन्यांकडून घरगुती आणि व्यावसायिक वापराच्या गॅस सिलिंडरचे दर जाहीर करण्यात आले आहेत. मात्र यामध्ये कुठलाही बदल करण्यात आलेला नाही. यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
1000 इंजिनिअर्स तरुणांना मिळणार नोकरीची संधी; ‘या’ मोठ्या कंपनीने जाहीर केली भरती
मागील पाच महिन्यांपासून घरगुती सिलेंडरच्या किंमती स्थिर आहेत. दरम्यान, 1 ऑक्टोबर रोजी व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात 25.5 रुपयांची कपात करण्यात आली होती. त्यानंतर मागील महिन्यात व्यावसायिक वापरासाठी असलेल्या गॅस सिलेंडरच्या किंमतीत 115.50 रुपयांची कपात करण्यात आली होती. घरगुती वापरासाठी असणारा गॅस सिलिंडर 14.2 किलोचा असतो. सध्या याची किंमत दिल्लीत 1053 रुपये इतकी आहे. तर मुंबई, कोलकत्ता, चेन्नई या शहरांमध्ये अनुक्रमे 1052.50, 1079, 1068.50 रुपये इतकी आहे.
आता महिला चालवणार राज्याचा कारभार? उद्धव ठाकरेंचं वक्तव्य चर्चेत
याशिवाय व्यावसायिक वापरासाठीचा गॅस सिलिंडर 19 किलोचा असतो. यामुळे याच्या किंमती घरगुती गॅस सिलिंडरच्या तुलनेत जास्त असतात. सध्या दिल्लीमध्ये व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरचा दर 1744 रुपये आहे. याशिवाय कोलकत्ता, मुंबई, चेन्नई येथे अनुक्रमे 1846, 1696, 1893 रुपये इतका आहे. वर्षाच्या शेवटच्या महिन्यात दर स्थिर राहिल्याने ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी ही काढणार संवाद यात्रा