रस्त्यावरील गाड्यांचा तांत्रिक बिघाड झाला तर पटकन काहितरी उपाययोजना करता येते. परंतु, हवेत चालणाऱ्या विमान, हेलिकॉप्टर यांसारख्या वाहनांमध्ये बिघाड झाला तर? तारांबळ उडणारच ना बॉस! अगदी अशीच काहीशी घटना आज घडली आहे. पुण्यावरून हैद्राबादला निघालेले भारतीय वायुदलाच्या चेतक हेलिकॉप्टरमध्ये ( Indian Airforce’s Helicopter) आज असाच तांत्रिक बिघाड झाला होता. यामुळे या हेलिकॉप्टरचे एमरजन्सी लँडिंग (Emergency Landing) करण्यात आले. हे लँडिंग खांडज गावातील एका शेतात उतरवले आहे.
दिलासदायक! एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त; पाहा नवीन दर
बारामती तालुक्यातील खांडज या गावातील शेतकरी हनुमंत ज्ञानदेव आटोळे यांच्या शेतात हे हेलिकॉप्टर उतरवण्यात आले. या हेलिकॉप्टरमध्ये तीन पुरुष व एक महिला प्रवास करत होती. सुदैवाने यातील कोणालाही कसलीच इजा झाली नसून सर्व प्रवासी सुरक्षित आहेत. यावेळी माळेगाव पोलीस बंदोबस्तासाठी तैनात होते. दरम्यान हेलिकॉप्टरची दुरुस्ती झाल्यानंतर ते सोलापूर येथे रवाना होईल.
ब्रेकिंग! सोलापूर सीमालगतची ‘ही’ 22 गावे कर्नाटकात जाणार
खांडज येथे अचानक हेलिकॉप्टर लँड झाल्याने या परिसरात मोठी खळबळ उडाली होती. आजूबाजूच्या परिसरातील लोक मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते. इतकेच नाही तर याठिकाणी नक्की काय झाले आहे ? याबाबत माहिती नसल्याने लोकांमध्ये अफवा देखील पसरल्या होत्या. दरम्यान परिस्थिती आटोक्यात ठेवण्यासाठी ठिकठिकाणी पोलीस तैनात होते.