श्रीगोंदा : अपघाताच्या घटना थांबायचं नाव घेत नाहीत. सतत कुठे ना कुठे अपघात चालूच आहे. सध्या अशीच एक अपघाताची धक्कादायक घटना श्रीगोंदा (Shrigonda) तालुक्यातील आढळगावमध्ये घडली आहे. पुढे चालणाऱ्या वाहनाच्या धुळीमुळे रोड अंदाज चुकल्याने अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे.
कष्टकरी हातालाच देव भेटे; हेच बहिणाबाईंच तत्वज्ञान – इंद्रजीत भालेराव
आढळगाव (Adhalgaon) येथील कुकडी मुख्य वितरिका जवळ क्रुझर गाडी पहाटेच्या सुमारास पुण्याच्या दिशेने चालली होती त्यावेळी समोरून गेलेल्या वाहनांमुळे मोठा धुरळा उडाल्याने क्रुझर वाहनाच्या चालकाला रस्त्याचा अंदाज आला नाही. त्यामुळे वाहनावरील नियंत्रण सुटून वाहन कुकडी वितरिकेत जाऊन आदळले. या अपघातामध्ये एका वॄध्द महिलेचा मृत्यू झाला असून इतर पाच जण जखमी झाले आहेत.
राज्यपाल कोश्यारींच्या विरोधातील पहिला बंद ‘या’ शहरामध्ये
या घटनेची माहिती मिळताच तेथील स्थानिक नागरिकांनी अपघातग्रस्थांना वाहनातुन बाहेर काढले. व रुग्णवाहिकेला फोन केला. आता अपघातग्रस्थांवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे.
माळशिरस तालुक्यातील दोन जुळ्या बहिणींनी एकाच मुलासोबत केलं लग्न