ऐन रब्बी हंगामात महावितरणने थकीत वीजबिल आकारणी सुरू केली आहे. दरम्यान काही ठिकाणी वीजतोडणी देखील करण्यात आली. यामुळे शेतकरी चिंतेत होते. यापार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी थकीत वीजबिल तात्पुरते स्थगित करून चालू वीजबिल भरण्यासंदर्भात घोषणा केली होती. परंतु, अजूनही राज्यातील शेतकऱ्यांमध्ये वीजबिलाबाबत संभ्रमावस्था आहे. यावर कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी “शेतकऱ्यांनी केवळ चालू वीजबिल भरावे असा सरकारचा स्पष्ट आदेश आहे.” असे सांगितले आहे.
“मी प्रत्येक गोष्टींवर…”, मानसी नाईकच्या पतीची इंस्टाग्राम पोस्ट चर्चेत
अचानक वीज तोडणी झाल्यामुळे शेतकऱ्यांचे संतापने साहजिकच आहे. परंतु, शेतकऱ्यांनी चालू बील भरावे यावर कॅबिनेटमध्ये चर्चा झाली असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तसे आदेश देखील दिले आहेत. एवढेच नाही तर मंत्रालयाच्या सचिवांना सुद्धा कुठल्याही शेतकऱ्याची वीज तोडण्यात येऊ नये असे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी फक्त चालू वीजबिल द्यावे. असे कृषिमंत्री अब्दुल सत्तार ( Abdul Sattar) म्हणाले आहेत.
जुळ्या बहिणींसोबत लग्न करणे पडले महागात; नवरदेवाविरोधात पोलिसात गुन्हा दाखल
याशिवाय शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच अतिवृष्टीमध्ये झालेली नुकसान भरपाई विम्याच्या स्वरूपात मिळणार आहे. पीक विम्याची छाननी अंतिम टप्प्यात सुरू असून लवकरात लवकर शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. त्यामुळे अनुदान मिळताच शेतकऱ्यांनी चालू वीजबिल ( Electricity bill) भरून टाकावे. यामुळे त्यांची वीज तोडणी होणार नाही. असे म्हणत अब्दुल सत्तार यांनी शेतकऱ्यांना लवकरात लवकर चालू वीजबिल भरण्याची विनंती केली आहे.