प्रत्येक नागरिकाला कुठला ना कुठला सेवाकर हा भरावाच लागतो. अन्यथा कायदेशीर कारवाई होते. पण सेवा न मिळताच कर भरावा लागत असेल तर ? चंद्रपूर येथील सोमनपल्ली (Somanpalli) गावात एक धक्कादायक घटना घडली आहे. त्याच झालंय अस की, या गावातील कुटुंबांनी पाणीपट्टी भरली नाही म्हणून ग्रामपंचायतीने (Grampanchayat) त्यांना थेट न्यायालयाची नोटीस पाठवली आहे. यामध्ये 52 कुटुंबांचा समावेश आहे. परंतु, गावात पाणीपुरवठा होतच नसल्याची तक्रार या ग्रामस्थांनी केली आहे.
कौतुकास्पद! फक्त 11 वर्षे वयाचा मुलगा घेतो UPSC चे क्लास
सोमनपल्ली या गावाची लोकसंख्या जवळपास एक हजार चारशे आहे. या गावात 5 लाख 53 हजार 714 रुपयांचे पाणीकर ( Water tax) थकीत होते. हे मागील चार वर्षांचे पाणीकर आहे. यामुळे ग्रामपंचायतीने या कुटुंबांना न्यायालयाची नोटीस पाठवली आहे. मात्र या गावात धाबा पाणीपुरवठा योजनेतून पाणी पुरवठा केला जातो. गावात शक्यतो वेळेत पाणी येत नाही. महिन्यातून केवळ 10 ते 12 दिवसच पाणीपुरवठा या गावाला होतो.
17 डिसेंबरला सरकारविरोधात महाविकासआघाडीचा महामोर्चा
यामुळे या गावातील बहुतेक लोक विहीर किंवा बोअरवेलचे पाणी भरतात. यासाठी त्यांना फार दूरपर्यंत पायपीट देखील करावी लागते. यामुळे या गावातील ग्रामस्थांनी पाणी पुरवठा होत नसल्याची तक्रार केली आहे. अशातच ग्रामपंचायतीने सोमनपल्ली मधील कुटुंबांना न्यायालयाची नोटीस पाठवली आहे. यामुळे गावकरी चिंतेत आहेत. प्रशासन यावर काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.