शेतकरी कुटुंबातील मुलाची यशाला गवसणी; MPSC ची परीक्षा उत्तीर्ण होऊन झाला PSI

Yashala Gavasani, a farmer family member; Jhala PSI passed the MPSC exam

सरकारी नोकरी आजच्या तरुणांना अधिक सुरक्षित वाटते. उत्तम सोयीसुविधा व गलेलठ्ठ पगार यामुळे सरकारी नोकरी फायदेशीर ठरते. म्हणूनच ग्रामीण भागातील अनेक तरुण स्पर्धा परीक्षांची ( Competitive Exams) तयारी करून अधिकारी होण्याचे स्वप्न रंगवतात. यासाठी झटून अभ्यास देखील करतात. परंतु, यामध्ये यशस्वी होणाऱ्या तरुणांची संख्या फार कमी आहे. खूप कमी तरुण स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवतात. पाथर्डी येथील एका शेतकरी कुटुंबातील मुलाने अतिशय खडतर परिस्थितीमध्ये अभ्यास करत स्पर्धा परीक्षेत यश मिळवले आहे.

17 डिसेंबरला सरकारविरोधात महाविकासआघाडीचा महामोर्चा

पाथर्डी येथील मालेवाडी गावातील रामहरी अण्णासाहेब खेडकर यांनी MPSC मध्ये यश मिळवून आपल्या गावचे नाव मोठे केले आहे. रामहरी खेडकर यांनी PSI होऊन दाखवल्याने सर्वच स्तरांतून त्यांचे कौतुक होत आहे. रामहरी हे अतिशय सामान्य कुटुंबातील आहेत. त्यांचे आईवडील शेतकरी असल्याने अतिशय हलाखीच्या परिस्थितीचा त्यांनी सामना केला आहे. रामहरी यांचे प्राथमिक शिक्षण त्यांच्या गावातील जिल्हा परिषद शाळेत झाले असून त्यांनी प्रशासनामध्ये हवालदार म्हणून सेवा बजावली आहे.

कौतुकास्पद! फक्त 11 वर्षे वयाचा मुलगा घेतो UPSC चे क्लास

शेगाव (Shegaon) पोलीस ठाण्यात तब्बल सहा वर्षे हवालदार म्हणून रामहरी काम करत होते. पोलीस प्रशासनामध्ये काम करत असतानाच त्यांनी MPSC परीक्षेचा अभ्यास केला. एकाच वेळी नोकरी आणि अभ्यास ही कसरत सांभाळत त्यांनी जिद्दीने PSI पद मिळवून दाखविले. रामहरी यांच्या या यशाने आज त्यांच्या शेतकरी आईवडिलांची मान अभिमानाने उंचावली आहे. शेवटी ते म्हणतात ना, ‘कोशीश करणे वालोंकी कभी हार नहीं होती !’

पाणीपट्टी थकल्यामुळे ग्रामपंचायतीकडून गावकऱ्यांना थेट न्यायालयाची नोटीस; वाचा सविस्तर

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *