फलटण: लावणी ही महाराष्ट्राची प्रसिद्ध लोककला समजली जाते. अनेक ठिकाणी आजही ही लोककला जोपासली आहे. परंतु, अलीकडच्या काळात लावणीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत चालला आहे. याला कारण म्हणजे लावणी कलाकार! मागील काही दिवसांपासून गौतमी पाटील ( Gautami Patil) हे नाव अचानक चर्चेत आले आहे. लावणी करताना अश्लील हावभाव करणाऱ्या गौतमी पाटील हिचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. गौतमी पाटीलची लावणी करण्याची पद्धत पाहून अनेक स्तरांतून तिच्यावर आरोप होत आहेत.
मोठी बातमी! दुधाच्या दरात पुन्हा ३ रुपयांनी दरवाढ
दरम्यान गौतमी पाटीलच्या लावणी कार्यक्रमात चुकीचे प्रकार होण्याच्या घटना देखील दिवसेंदिवस वाढत आहेत. काही आठवड्यांपूर्वी तिच्या एका कार्यक्रमात मृत्यू झाल्याची घटना घडली होती. यानंतर काल रात्री फलटण ( Faltan) येथे झालेल्या कार्यक्रमात देखील लोकांची डोकी फुटली आहेत. त्याच झालं असं की, फलटण येथील नदीकाठच्या गावात गौतमी पाटील हीचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात काही गैरप्रकार होऊ नये यासाठी प्रशासनाकडून आधीपासूनच सूचना देण्यात आल्या होत्या.
बिग ब्रेकिंग! बेळगावमध्ये महाराष्ट्रातील वाहनांवर दगडफेक
त्यामुळे कार्यक्रमात तसे नियोजन देखील करण्यात आले होते. परंतु, रात्री उशिरा कार्यक्रम रंगात आल्यानंतर मात्र लोकांना चेव चढला आणि नियोजन ढासळले. या कार्यक्रमात झालेल्या गोंधळात अनेक जणांची डोकी फुटली आहेत. लोक रक्तबंबाळ झाले आहेत. रात्रीच्या वेळी उशिरा हे लोक दवाखाने शोधत होते. या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा गौतमी पाटील आणि तिची लावणी चर्चेत आली आहे.