पीएमपीएमएलची बससेवा ही ग्राहकांसाठी सोयीची होती. परंतु, मागील काही काळापासून ही सेवा बंद असल्याने ग्राहकांची गैरसोय होत होती. दरम्यान ग्रामीण भागातील पीएमपीएमएलची बससेवा पूर्वरत करण्याच्या सूचना पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील (Chandrakant Dada Patil) यांनी दिल्या आहेत. यासंबंधीत माहिती आमदार राहुल कुल ( Rahul Kul) यांनी दिली आहे.
50 गुंठ्यात 120 टन ऊसाचे उत्पादन काढून शेतकऱ्याचा विक्रम; वाचा सविस्तर
कोरोना काळात महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची बससेवा बंद करण्यात आली होती. यावेळी कोरोनाची लाट कमी होत असताना पीएमपीएमएलने ( PMPL Bus) ग्रामीण भागातील नागरिकांसाठी आपली बससेवा सुरू केली होती. ग्रामीण भागातील अनेक मार्गांवर ही बससेवा सुरू होती. नागरिकांना याचा फायदा देखील होत होता.
बाई नाचली, डोकी फुटली; पुन्हा एकदा गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात राडा
मात्र, कोरोनानंतर जनजीवन पुन्हा एकदा पहिल्यासारखे सुरु झाल्यानंतर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची बससेवा सुरू झाली. यावेळी महामंडळाने पीएमपीएमएल प्रशासनाकडे पत्र लिहून बससेवा बंद करण्याची मागणी केली होती. यामुळे ही बससेवा टप्प्याटप्प्याने बंद करण्यात आली.
बिग ब्रेकिंग! बेळगावमध्ये महाराष्ट्रातील वाहनांवर दगडफेक
दरम्यान ग्रामीण भागातील नागरिकांनी ही बससेवा सुरू ठेवण्याची मागणी केली होती. यावर पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी सकारात्मक भूमिका घेत पीएमपीएमएलचे संचालक ओमप्रकाश बकोरिया यांना ही बससेवा पूर्वरत करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे ग्रामीम भागातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे.