महावितरणने थकीत वीजबिल आकारणी सुरू केली आहे. यासाठी त्यांनी ‘नाक दाबले की तोंड उघडते’ हे तंत्र वापरून वीज तोडणी देखील सुरू केलीय. यामुळे राज्यातील शेतकरी चिंतेत आहेत. अशातच वीज दर वाढ होण्याची शक्यता आता वर्तवली जात आहे. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या महागाईचा फटका आता सामान्य नागरिकांसह शेतकऱ्यांना देखील बसणार असून राज्यात लवकरच वीज दर वाढ होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत पुन्हा एकदा वाढ होणार आहे.
“शरद पवारांनी पोलिसांकडून मार खाल्लेला पुरावा…”; नीलेश राणेंचे ट्विट चर्चेत
राज्य सरकारने ( State Government) थकीत विजबिलाला तात्पुरती स्थगिती देऊन चालू वीजबिल भरण्याच्या सूचना शेतकऱ्यांना दिल्या होत्या. यामुळे त्यांना दिलासा मिळतोय तोच वीज दर वाढीचे नवीन संकट शेतकऱ्यांसमोर येऊन उभे राहिले आहे. राज्यात 75 पैसे ते 1 रुपया 30 पैसे प्रति युनिट अशी विजेची दरवाढ होऊ शकते. यामुळे सामान्य नागरिक व शेतकरी या दोघांनाही मोठा आर्थिल फटका बसणार आहे. राज्य वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे यांनी वीज दर वाढीबाबत माहिती दिली आहे.
चक्क भाकरीवर बाबासाहेबांचे चित्र काढून केले अभिवादन; सोशल मीडियावर फोटो व्हायरल
बहुतेक लोकांची वीजबिल थकीत असल्याने महावितरणची आर्थिक स्थिती हालाखीची आहे. तसेच महावितरण वरील कर्जाचा बोजा देखील दिवसेंदिवस वाढतोय. नवीन झालेल्या कायद्यांमुळे आणखी कर्ज घेणे आता महावितरणला ( MSEB) शक्य नाही. यामुळे वीजबिल वसुलीशिवाय त्यांच्याकडे दुसरा कुठलाच पर्याय उरलेला नाही. थकीत रकमेचा आकडा मोठा असल्याने महावितरणने वीज तोडणीचा मोठा निर्णय घेतला आहे. अशातच आणखी एक पर्याय म्हणून महावितरण वीज दरवाढ करू शकते. यामुळे राज्यावर वीजदरवाढीचे संकट येणार आहे.
जनावरांना मिळणार अवघ्या 300 रुपयांत विमा; वाचा सविस्तर माहिती