
दौंड: सध्या संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर बाजारात पतंगांची विक्री सुरू झाली आहे. अनेक रंगीबेरंगी पतंगांनी बाजारपेठा सजल्या आहेत. हे पतंग जितके पहायला छान वाटतात तितकेच ते धोकादायक देखील असतात. कारण, पतंगाच्या मांज्याने अपघात होऊन मृत्यु होण्याच्या घटना कायम आजूबाजूला घडत असतात. अशीच एक घटना दौंड शहरात घडली आहे. पतंग उडवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या नायलॉनच्या ( Naylon) मांज्याने गळा चिरल्याने एका मध्यमवयीन पुरुषाचा मृत्यू झाला आहे.
चक्क भाकरीवर बाबासाहेबांचे चित्र काढून केले अभिवादन; सोशल मीडियावर फोटो व्हायरल
गाडी चालवत असणाऱ्या एका व्यक्तीचा नायलॉन मांज्याने गळा कापून मृत्यु झाला आहे. दौंड शहरात नायलॉन मांज्याला बंदी असून देखील हा प्रकार घडल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. दौंड ( Daund) शहरातील अहमदनगर काष्टी रस्त्यावरील चौकातून जात असताना ही घटना घडली आहे. अचानकपणे समोर आलेल्या नायलॉन मांज्याने गळा चिरल्याने गळ्यातून रक्तस्राव सुरू झाला.
“शरद पवारांनी पोलिसांकडून मार खाल्लेला पुरावा…”; नीलेश राणेंचे ट्विट चर्चेत
यावेळी उपस्थित नागरिकांनी व्यक्तीला तात्काळ रुग्णालयात हलवले. दौंड उपजिल्हा रुग्णालय जवळ असल्याने या रुग्णालयातच त्यांना दाखल करण्यात आले आहे. मांज्यामुळे श्वासनलिका व रक्तवाहिन्या चिरल्याने मोठ्या प्रमाणात दुखापत झाली व त्यांचा जागीच मृत्यु झाला. अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
“शरद पवारांना बेळगावाला जायची गरज पडणार नाही” – देवेंद्र फडणवीस