
मागील काही दिवसांपासून गौतमी पाटील हे नाव चांगलेच चर्चेत आहे. लावणी कलाकार म्हणून ओळख असणाऱ्या गौतमी पाटीलवर अनेक गंभीर आरोप देखील झाले आहेत. लावणी करताना अश्लील हावभाव करण्यावरून गौतमी पाटील ( Gautami Patil) टिकेच्या फेऱ्यात अडकली आहे. मागे एका सांस्कृतिक कार्यक्रमात अंगावर पाणी ओतून, विचित्र हावभाव करून नाचताना गौतमीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. यावरून गौतमीला मोठ्या प्रमाणात ट्रोल देखील केले गेले होते. दरम्यान आता खंडोबा यात्रेदरम्यान गौतमीच्या कार्यक्रमात चेंगराचेंगरी झाली आहे.
दौंडमध्ये मांज्याच्या नायलॉनमुळे दुचाकीस्वाराचा गळा चिरून जागीच मृत्यु
तुळजापूर ( Tuljapur) तालुक्यातील वडगाव येथे खंडोबा यात्रेनिमित्त गौतमी पाटीलच्या लावणीचा कार्यक्रम ठरवण्यात आला होता. यावेळी कार्यक्रमात मोठी गर्दी झाली होती. गौतमी पाटीलची एक झलक पाहण्यासाठी येथे चाहते जमले होते. इतकंच नाही तर काही लोक झाडावर सुद्धा चढले होते. ही गर्दी इतकी वाढत गेली की, कार्यक्रमात चेंगराचेंगरी झाली. यामुळे गर्दीला थांबविण्यासाठी पोलिसांना बोलविण्यात आले होते. या गर्दीतून बाहेर पडताना गौतमीला सुद्धा भरपूर त्रास सहन करावा लागला.
शेतकऱ्यांना बसणार आर्थिक फटका; राज्यात वीज दरवाढ होणार
गर्दीतून बाहेर पडण्यासाठी कसलीच सोय नसल्याने गौतमीला चक्क पोलिसांच्या गाडीत बसून बाहेर पडावे लागले. याआधी देखील गौतमीच्या लावणी कार्यक्रमात भयानक किस्से घडले आहेत. फलटण (Falatan) येथे झालेल्या कार्यक्रमात तर लोकांची डोकी फुटली होती. शिवाय सांगली येथे झालेल्या कार्यक्रमात एका माणसाचा संशयास्पद मृत्यू झाला होता. यामुळे गौतमी पाटील आणि तिची लावणी हा महाराष्ट्रात वादाचा मुद्दा बनला आहे.
चक्क भाकरीवर बाबासाहेबांचे चित्र काढून केले अभिवादन; सोशल मीडियावर फोटो व्हायरल