Rohit Pawar: “…तर यापुढं शांत बसणार नाही”, सीमावादावर रोहित पवारांनी दिली प्रतिक्रिया

Rohit Pawar reacts on borderism, "...there will be no rest".

मागच्या काही दिवसांपासून महाराष्ट्र-कर्नाटक (Maharashtra-Karnataka) सीमावाद चालू आहे. मात्र आता हा वाद आणखी चिघळला आहे. बेळगावजवळ हिरेबागवाडी कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांकडून काल महाराष्ट्राच्या वाहनांवर दगडफेक करण्यात आली आहे. यावर अनेक स्तरातून प्रतिक्रिया येत आहेत. आता राष्ट्रवादी पक्षाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे.

गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात पुन्हा एकदा राडा; पोलिसांनी गौतमीलाच गाडीत बसवलं अन्..

रोहित पवार यांनी याबाबत एक ट्विट केले आहे. ट्विट करत त्यांनी लिहिले की, ‘कन्नड रक्षण वेदिके’चे कार्यकर्ते महाराष्ट्राचे ट्रक फोडून धुडगूस घालत असताना, हवेत राजकीय गोळीबार करणारे भाजपचे नेते कुठं आहेत? निवडणूक डोळ्यापुढं ठेवून कर्नाटकातील भाजप सरकार आक्रमक होतंय, तर महाराष्ट्रातील भाजपप्रणित सरकार मात्र आपली अस्मिता विसरुन मिळमिळीत भूमिका घेतंय.

गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात पुन्हा एकदा राडा; पोलिसांनी गौतमीलाच गाडीत बसवलं अन्..

त्याचबरोबर रोहित पवारांनी पुढे लिहिले की, “संवादातून मार्ग काढता येतो, पण वाहनांवर दगड मारणं हा कसला संवाद?राज्य सरकारच्या मिळमिळीत भूमिकेमुळं महाराष्ट्र झुकला, असा अर्थ कर्नाटकाकडून काढला जातोय. पण राज्यावर आणि राज्याच्या अस्मितेवर असेच हल्ले होत राहिले, तर कधीही कुणापुढं न झुकणारा महाराष्ट्र यापुढं शांत बसणार नाही”.

शेतकऱ्यांना बसणार आर्थिक फटका; राज्यात वीज दरवाढ होणार

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *