मुंबई : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर तब्बल 40 दिवसांनी एकनाथ शिंदेनी (Eknath Shinde) आज त्यांच्या सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार केला आहे. बरेच दिवस रखडलेला मंत्रिमंडळाचा विस्तार आज राजभवनर या ठिकाणी पार पडला आहे. शिंदे गटातून नऊजण आणि भाजपातून नऊजण असे एकूण १८ मंत्र्यांनी या मंत्रिमंडळ विस्तारात शपथ घेतली. यावेळी विरोधी पक्ष नेते अजित पवार, भाजप नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, विनोद तावडे, रावसाहेब दानवे पाटील, तसेच भाजप व शिंदे गटातील आमदार उपस्थित होते.
भाजपातून मंत्रिमंडळात या नेत्यांना मिळाली संधी –
१) राधाकृष्ण विखे पाटील
२) सुधीर मुनगंटीवार
३) चंद्रकांत दादा पाटील
४) विजयकुमार गावित
५ ) गिरीश महाजन
६) सुरेश खाडे
७) रवींद्र चव्हाण
८) अतुल सावे
९) मंगलप्रभात लोढा
शिंदे गटातून मंत्रिमंडळात या नेत्यांना मिळाली संधी –
१) गुलाबराव पाटील
२) दादा भुसे
३) संजय राठोड
४) संदीपान भुमरे
५) उदय सामंत
६) तानाजी सावंत
७) अब्दुल सत्तार
८) दीपक केसरकर
९) शंभूराज देसाई