सध्या महाराष्ट्रात एका जुन्याच संकटाने नव्याने आपले बस्तान मांडले आहे. फार वर्षांपासून सुरू असलेला महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पुन्हा एकदा उभा राहिलाय. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगली जिल्ह्यातील 40 गावांवर आपला हक्क सांगितला आहे. यामुळे महाराष्ट्रातील राजकिय वातावरण देखील चांगलेच तापले आहे. शिंदे- फडणवीस सरकार हा वाद कसा सोडवणार यावर अवघ्या राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. पण मुळात कर्नाटक, महाराष्ट्र या दोन्ही राज्यांसह केंद्रात सुद्धा भाजपची ( BJP) सत्ता असताना हा वाद इतका वाढलाच कसा? असा प्रश्न उपस्थित होतोय.
बारामतीतील बालसुधार गृहातील मुलाचे स्पर्धा परीक्षेत यश; स्वतःच्या हिंमतीवर झाला अधिकारी
खरं पहायला गेलं तर, भाजप राजकीय स्वार्थासाठी व आपला अजेंडा पसरविण्यासाठी अगदी आधीच्या काळापासून असे वाद स्वतः उकरून काढून पुन्हा बुजवण्याचे काम करत आले आहे. आता महाराष्ट्र-कर्नाटक (Maharashtra- Karnataka) सीमावादाचा मुद्दाच बघा, कर्नाटक निवडणुका तोंडावर येताच कर्नाटकात भाजपने हा वाद उकरून काढलाय. यात दोन्ही गटात आपलेच खेळाडू ठेऊन पद्धतशीर नाटक रचल्याचे दिसून येत आहे. कर्नाटक- महाराष्ट्र सीमा प्रश्नावरून लोकांकडून मते घ्यायची. मते घेण्यासाठी किंवा जनमत तयार करण्यासाठी एकाने मारल्यासारख करायचं दुसऱ्याने लागल्यासारख विव्हळायच हा भाजपचा जुना फंडा आहे.
मोठी बातमी! कुकडी साखर कारखान्यावर उद्या परिसंवाद मेळावा
याची झळ मात्र सामान्य लोकांना बसते. गुजरात निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील दोन मोठे प्रकल्प गुजरातकडे वळविण्यात आले. याचा परिणाम नुकत्याच लागलेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीच्या निकालात दिसतच आहे. असंच काहीसं कर्नाटक – महाराष्ट्र सीमावादात होण्याची शक्यता आहे. एकहाती सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपच्या सुरू असलेल्या या खेळी एकदिवस नक्कीच भाजपच्याच तोंडघशी पडतील यात शंका नाही.