मुंबई : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर तब्बल 40 दिवसांनी एकनाथ शिंदेनी (Eknath Shinde) आज त्यांच्या सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार केला आहे. बरेच दिवस रखडलेला मंत्रिमंडळाचा विस्तार आज राजभवनर या ठिकाणी पार पडला आहे. शिंदे गटातून नऊजण आणि भाजपातून नऊजण असे एकूण १८ मंत्र्यांनी या मंत्रिमंडळ विस्तारात शपथ घेतली. यामध्ये शिंदे गटाच्या संजय राठोड यांनीही शपथ घेतली. या शपथविधीनंतर चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी संजय राठोडांवर (Sanjay Rathod) टीका करत पूजा चव्हाण प्रकरणातील माझा त्यांच्याविरुद्धचा लढा चालूच राहील. असं त्यांनी म्हंटल आहे.
चित्रा वाघ ट्विट करत म्हणाल्या की, “पुजा चव्हाण च्या मृत्युला कारणीभूत असणार्या माजी मंत्री संजय राठोड ला पुन्हा मंत्रीपद दिलं जाणं हे अत्यंत दुदैवी आहे. संजय राठोड जरी पुन्हा मंत्री झालेला असला तरीही त्याच्या विरुद्धचा माझा लढा मी सुरूचं ठेवलेला आहे. माझा न्याय देवतेवर विश्वास. लडेंगे….जितेंगे”
पुजा चव्हाण च्या मृत्युला कारणीभूत असणार्या माजी मंत्री संजय राठोड ला पुन्हा मंत्रीपद दिलं जाणं हे अत्यंत दुदैवी आहे
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) August 9, 2022
संजय राठोड जरी पुन्हा मंत्री झालेला असला तरीही त्याच्या विरुद्धचा माझा लढा मी सुरूचं ठेवलेला आहे
माझा न्याय देवतेवर विश्वास
लडेंगे….जितेंगे 👍 @CMOMaharashtra pic.twitter.com/epJCMpvHLB
दरम्यान, संजय राठोड यांच्यावर पूजा चव्हाण (Pooja Chavan) आत्महत्या प्रकरणाचा आरोप आहे. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर त्यांना पुन्हा एकदा मंत्रिपद मिळालं आहे. पण त्यांच्याविरुद्ध माझा लढा कायम राहील अशी टीका चित्र वाघ यांनी केली आहे.