लहान मुले प्रचंड करामती असतात. ते कधी काय करतील याचा अंदाज लावता येत नाही. त्यांचे वय हे खेळकर असते. त्यामुळे खेळात ते काहीही करतात. यासाठी लहान मुलांना सांभाळताना पालकांना डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवावे लागते. कारण, ‘नजर हटी दुर्घटना घटी’ असं काहीसं या मुलांच्या बाबतीत होत. अशीच एक घटना सध्या औरंगाबाद ( Aurangabad) मध्ये घडली आहे. औरंगाबाद येथील लहान मुलाने आईचे लक्ष नसताना एक करामत केली आणि त्याचा जागीच मृत्यु झाला.
“फुले,आंबेडकर, कर्मवीर यांनी शाळांसाठी लोकांकडे भीक मागितली”- चंद्रकांत पाटील
औरंगाबादमधील सोमपुरी येथील पाच वर्षाच्या चिमुकल्याला तारेचा शॉक ( Electric Shock) लागला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अनस इलियास शेख असे या मुलाचे नाव असून या घटनेत त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. दरम्यान वीज वितरण कंपनीच्या चुकीमुळे या चिमुकल्याचा जीव गेला असल्याची तक्रार गावकऱ्यांकडून करण्यात येत आहे. त्याच झालं असं की, घरामध्ये खेळत असणारा अनस आईचे लक्ष नाही हे बघुन खेळत खेळत घराबाहेर आला. यावेळी करंट असलेली तार तेथे लटकली होती. खेळता खेळता अनसने या तारेला हात लावला.
कांद्याच्या दरांमुळे शेतकरी चिंतेत; नव्याला भाव नाही जुना घरीच सडण्याच्या मार्गावर!
दुर्दैवाने यावेळी कोणीच उपस्थित न्हवते. या बालकाची आई घरात कामात व्यस्त होती. अनस ला काहीतरी झाल्याचे पासून आजूबाजूच्या लोकांनी आरडाओरडा केला. यावेळी अनसची आई घराबाहेर आली आणि तात्काळ त्याला रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, रुग्णालयात जाण्याआधीच त्याचा मृत्यु झाला होता. या घटनेने संपूर्ण शेख कुटुंब हादरले असून वीज वितरण कंपनीच्या चुकीमुळे या लहान मुलाने आपला जीव गमावला आहे.
कर्नाटक, महाराष्ट्र या दोन्ही राज्यांसह केंद्रात सुद्धा भाजपची सत्ता, तरीही का पेटतोय सीमावाद?