अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील महामार्गांची दुरावस्था झालेली आहे. दरम्यान, महामार्गाची लवकरात लवकर दुरुस्थी करण्यात यावी यासाठी आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) उपोषणाला बसले आहेत. आज उपोषणाचा तिसरा दिवस आहे.
“…अन् त्या लहान मुलाचा जागीच मृत्यु झाला”; वीज वितरण कंपनीच्या चुकीमुळे घडला धक्कादायक प्रकार
आज निलेश लंके यांची डॉक्टरांनी तपासणी केली. यावेळी त्यांची तब्बेत काहीशी खालावली असून तीन किलो वजन कमी झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. मात्र काळजी करण्यासारख काहीही नाही असं देखील डॉक्टर यावेळी म्हणाले.
अहमदनगर जिल्ह्यातील महामार्गाची दुरावस्था झाली आहे. या महामार्गाची दुरुस्ती करण्यात यावी, या मागणीसाठी निलेश लंके गेले तीन दिवस अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत.
विरोधी पक्षनेते अजित पवार आज श्रीगोंदा दौऱ्यावर; ‘असा’ असेल दौरा
त्यांच्या या आंदोलनांना पाठिंबा देण्यासाठी राज्याचे मा.महसूलमंत्री ना.बाळासाहेब थोरात साहेब, राज्याचे मा.राज्यमंत्री आ.प्राजक्तदादा तनपुरे, आ.रोहितदादा पवार,राष्ट्रवादी चे जेष्ठ नेते श्री.घनश्याम आण्णा शेलार यांनी देखील भेट दिली. त्याचबरोबर या आंदोलनासाठी मोठ्या संख्येने कार्यकर्ते देखील उपस्थित आहे.
कांद्याच्या दरांमुळे शेतकरी चिंतेत; नव्याला भाव नाही जुना घरीच सडण्याच्या मार्गावर!