राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तसेच पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापुरुषांबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याने त्यांच्यावर काल शाईफेक करण्यात आली आहे. आता याबाबत पोलिसांनी दखल घेतली असून. पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान पोलीस संरक्षणात असून देखील शाईफेक करण्यात आल्याने पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी ११ पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केल्याची माहिती समोर आली आहे.
चोख बंदोबस्त असून देखील चंद्रकांत पाटील यांच्यावर मनोज गरबडे आणि अजून दोन कार्यकर्त्यांनी शाई फेकली. याप्रकरणी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी मोठा निर्णय घेतला असून त्यांनी, आठ पोलीस कर्मचारी आणि तीन अधिकारी असे ११ जणांना निलंबित केले आहे.
चार पाय आणि चार हात असणाऱ्या मुलाचा ‘या’ ठिकाणी जन्म! सोशल मीडियावर फोटो होतोय व्हायरल
शाईफेकनंतर चंद्रकांत पाटलांनी दिली प्रतिक्रिया –
चंद्रकांत पाटील म्हणाले, “आपण कोणालाच घाबरत नाही. मात्र मी दिलगीरी व्यक्त करून देखील शाईफेक करण्यात आली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमाला धक्का लावत आहे” असं यावेळी ते म्हणाले आहेत.
काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील?
चंद्रकांत पाटील म्हणाले, “ पहिल्या काळात शाळांसाठी अनुदान देत नव्हते. तरीदेखील महापुरुषांनी शाळा उघडल्या. पण, आता लोकं शाळांच्या अनुदानासाठी सरकारवर अवलंबून राहत आहेत. त्याकाळी महापुरुषांना सरकारनं शाळा सुरु करण्यासाठी अनुदान दिले नाही, त्यांनी लोकांकडं भीक मागितली”.
मोठी बातमी! चंद्रकांत पाटलांवर शाईफेक प्रकरणी पोलिसांची केली तिघांना अटक