सोशल मीडिया लोकांना नाव, पैसा आणि प्रसिद्धी देत असते. आज सोशल मीडियावरचे अनेक स्टार्स लोकांमध्ये अगदी लोकप्रिय झाले आहेत. अरमान मलिक ( Araman Malik) हा प्रसिद्ध युट्युबर यातलाच एक असून सध्या तो वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. अरमानच्या दोन्ही पत्नी गरोदर असल्याची माहिती त्याने नुकतीच इन्स्टाग्राम ( Instagram) वरून दिली आहे. यावरून त्याला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात येत आहे.
२१ रागांवरील चित्रपट गीतांचा सुरदरबार रंगला
अरमान मलिक याचे व्हिडीओ युट्युब व इन्स्टाग्रामवर प्रचंड प्रसिद्ध आहेत. त्याचे इन्स्टाग्राम वर 1.5 मिलियन इतके फॉलोवर्स आहेत. अरमानच्या दोन्ही पत्नी पायल मलिक व कृतिका मलिक यांच्यासोबत तो व्हिडीओ शेअर करत असतो. पायल व कृतिका या दोघीही चांगल्या मैत्रिणी देखील आहेत. याशिवाय अरमानला एक मुलगा सुद्धा आहे. ही संपूर्ण मलिक फॅमिली एकत्र व्हिडीओ बनवत असते. त्यांच्या व्हिडीओना सोशल मीडियावर चांगलीच प्रसिद्धी मिळते.
मोठी बातमी! ‘या’ शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेची रक्कम परत करावी लागणार
अरमान मलिक याने नुकताच त्याच्या दोन्ही पत्नींसोबतचा एक फोटो शेअर केलाय. यामध्ये त्याच्या दोन्ही पत्नी एकत्रच गरोदर असल्याची बातमी त्याने दिलीय. या फोटोत पायल व कृतिका आपल्या बेबीबम्प सह दिसत आहेत. यावरून सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात प्रतिक्रिया देण्यात आल्या आहेत. तुम्ही लोकांनी थोडी तरी लाज ठेवावी, एकच नवरा दोघी जणी कसा काय शेअर करतात ? अशा प्रकारच्या टीका या मलिक फॅमिली वर करण्यात येत आहेत.