शिक्षण ही आजच्या काळातील सर्वात मोठी गरज आहे. जवळपास सगळेच पदवीपर्यंतचे शिक्षण घेत असतात. परंतु, महाराष्ट्रामध्ये पदवी अभ्यासक्रमात मोठा बदल होत आहे. येत्या काळात नवीन शैक्षणिक धोरणानुसार सर्व पदवी अभ्यासक्रमांचा कालावधी वाढविण्यात येणार आहे. पुढील शैक्षणिक वर्षात हे बदल होणार आहेत. राज्याच्या उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाने याबाबत सर्व विद्यापीठांना नियमावली तयार करण्यास सांगितले आहे.
मोठी बातमी! चंद्रकांत पाटलांवर शाईफेक करणाऱ्यावर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल
पुढील शैक्षणिक वर्ष 2023-24 महाराष्ट्रातल्या सर्व पदवी (UG) अभ्यासक्रमांचा कार्यकाळ चार वर्षांचा होणार आहे. आजपर्यंत विविध शाखांमधील पदवी अभ्यासक्रमांचा कालावधी तीन वर्षाचा होता. परंतु नवीन शैक्षणिक धोरण 2020 मध्ये झालेल्या बदलांनुसार हा एक मोठा बदल झाला आहे. यामुळे पदवीचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांना 4 वर्षे द्यावे लागणार आहेत
प्रसिद्ध युट्युबर अरमान मलिकच्या दोन्ही पत्नी एकाच वेळी गरोदर; सोशल मीडियावर होतोय ट्रोल.
महत्त्वाची गोष्ट म्हणजे या नव्या बदलानुसार विद्यार्थ्यांना या चार वर्षांच्या अभ्यासक्रमातून बाहेर पडण्याचा किंवा सोडण्याचा देखील पर्याय मिळणार आहे. यामध्ये पदवीचे पहिलं वर्ष पूर्ण केल्यानंतर बाहेर पडल्यास विद्यार्थ्याला फक्त प्रमाणपत्र मिळणार आहे. यानंतर दोन वर्षांनी बाहेर पडल्यास डिप्लोमा प्रमाणपत्र तर तीन वर्षांनी बाहेर पडल्यास बॅचलर डिग्री आणि चार वर्षं पूर्ण केल्यानंतर ऑनर्स किंवा संशोधनाची बॅचलर डिग्री ( Bachlors Degree) मिळेल, असे सांगण्यात आले आहे.
धक्कादायक! सहलीला निघालेल्या विदयार्थ्यांच्या बसचा भीषण अपघात