राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तसेच पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापुरुषांबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याने ते चांगलेच चर्चेत आले आहेत. यामुळे राजकीय वातावरण देखील चांगलेच तापले आहे. अशातच आता चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकून हल्ला करण्यात आला आहे. आता शाईफेक करणाऱ्या व्यक्तीवर जीवे मारण्याचा प्रयत्न करणे आणि सरकारी कामात अडथळा निर्माण करणे असे दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आता यावर मानवाधिकार कार्यकर्ते आणि वकील असीम सरोदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मोठी बातमी! राज्यात पदवी शिक्षण 4 वर्षांचे होणार; विद्यापीठांना नियमावली काढण्याचे आदेश
वकील असीम सरोदे यांनी याबाबत एक ट्विट केले आहे. ट्विट करत त्यांनी लिहिले की, “शाइफेक प्रकरण-कलम 307 म्हणजे जीवे मारण्याचा प्रयत्न करणे व 120 ब,आर्म्स ऍक्ट चा वापर अतिरेकीपणा आहे,यंत्रणांच्या मदतीने कायद्याच्या गैरवापराचे हे उदाहरण आहे त्यामुळे आमची लीगल टीम आरोपींची केस मोफत चालवेल.परंतु शाईफेकीचा व बेताल वक्तव्य करणाऱ्यांचा निषेध”.
आईला काम करताना ऊन लागू नये म्हणून चिमुरडीने केलेले कृत्य पाहून नेटकरी भावुक; पाहा VIDEO
दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मनोज भास्कर घरबडे, विजय धर्मा ओव्हाळ आणि धनंजय भाऊसाहेब इजगज या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आता त्यांना अटक करण्याची कारवाई देखील करण्यात आली आहे.
मोठी बातमी! चंद्रकांत पाटलांवर शाईफेक करणाऱ्यावर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल