मागच्या काही दिवसांपासून सातत्याने छत्रपती शिवरायांच्या नावावरून राजकारण रंगल्याचं पाहायला मिळत आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी देखील छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले होते. त्याचबरोबर भाजप आणि शिंदे गटातील काही काही नेत्यांनी देखील शिवरायांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल होते. यामुळे राज्याचे राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. आता यामध्ये नाना पटोले यांनी शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.
गुणरत्न सदावर्ते यांची मागणी, छत्रपती उदयनराजे महाराज यांना अटक करा
नाना पटोले म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराज हे कुणबी समाजाचे होते”, असं वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्याने नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. नाना पटोले हे अकोल्यात कुणबी समाजाच्या परिचय मेळाव्यात आले होते. यावेळी माध्यमांशी बोलताना नाना त्यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले आहे.
दौंडमधल्या चिरेबंदी वाड्याची सगळीकडे जोरदार चर्चा
दरम्यान, मागच्या काही दिवसांपासून अनेक नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केली आहेत. यामध्ये राज्यापाल भगतसिंह कोश्यारी, मंगलप्रभात लोढा, संजय गायकवाड, भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी आणि रावसाहेब दानवे या सर्वानी शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधान केले होते. असा दावा देखील नाना पटोलेंनी केला होता. पण आता त्यांनीच छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले आहे. यामुळे नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.