बिहारमध्ये आहे चक्क आयआयटीयन्सचे गाव! इथल्या तरुण पोरांची ‘ही’ कमाल नक्की वाचा

There is a village of IITians in Bihar! Be sure to read 'this' maxim of the young boys here

शिक्षण ही काळाची गरज आहे. यामुळे आजच्या काळात शिक्षणाला प्रचंड महत्त्व प्राप्त झाले आहे. देशात चांगल्या शैक्षणिक सोयी सुविधांसाठी बिहारची ओळख आहे. येथील एक गाव तर चक्क आयआयटीयन्स ( IIT) चे गाव म्हणून ओळखले जाते. ‘पटवा टोली’ असे या गावचे नाव आहे. या गावातील मुले मोठ्या प्रमाणात IIT मध्ये जातात. यामुळे या गावाची अशी ओळख निर्माण झाली आहे.

मोठी बातमी! महावितरणच्या गलथान कारभारामुळे संतोष मुंडेचा मृत्यू

पटवा टोली हे गाव बिहार ( Bihar) राज्यातील गया जिल्ह्यात आहे. या गावातील तरुण मुलांनी नव प्रयास नावाची संस्था स्थापन केली आहे. याठिकाणी IIT झालेली व IIT करणारी मुले IIT मध्ये जाऊ इच्छिणाऱ्या मुलांना मोफत मार्गदर्शन करतात. तसेच या तरुण मुलांनी मोफत ग्रंथालय सुरू केले आहे. येथे अभ्यासासाठी आवश्यक सर्व सामग्री उपलब्ध करून दिली जाते. इतकंच नाही तर तेथे संगणक सुद्धा आहेत.

धक्कदायक! श्रीगोंद्यातील तरुणीची सासरच्या लोकांकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून आत्महत्या

या गावात 1996 पासून कोणत्याही कोचिंग क्लास शिवाय जवळपास 300 मुलांची IIT ( Indian Institute Of Technology) मध्ये निवड झाली आहे. पटवा टोली गावातील जितेंद्रप्रसाद यांची 1992 साली IIT मध्ये निवड झाली. यानंतर आपल्या गावातील मुलांनी देखील IIT मध्ये जावे यासाठी जितेंद्रने 1996 मध्ये गावात मोफत ग्रंथालय सुरु केले. या ग्रंथालयात IIT ची पुस्तके उपलब्ध झाली आणि यानंतर गावातील IIT मध्ये जाणाऱ्या मुलांचा ओघ वाढला.

‘गोपी बहू’ लवकरच अडकणार लग्नबंधनात; चर्चाना उधाण

या गावात घडलेली ही क्रांती फक्त तरुणांमुळे झाली असून तरुण सळसळते रक्त मनात आणले तर काहीही करू शकते. हे या गावातील तरुणांनी दाखवून दिले आहे. खरंतर आजची तरुणाई बिघडत चालली आहे असे म्हणणाऱ्या लोकांना या गावातील तरुणांनी ‘ आजची तरुणाई घडतही चालली आहे’ हे त्यांच्या कृतीतून सिद्ध करून दाखवले आहे.

ब्रेकिंग! सर्वोच्च न्यायालयाने ठाकरे गटाला दिला मोठा धक्का!

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *