महामार्गवरून जाणाऱ्या गाड्यांना टोल भरणे अनिवार्य असतेच. मात्र यामध्ये प्रवाश्यांचा भरपूर वेळ वाया जातो. बऱ्याचदा टोल भरण्यासाठी तासनतास थांबावे लागते. मात्र आता सरकारने यावर नवीन निर्णय घेतला असून वाहन चालकांना टोल प्लाझावर जाऊन टोल भरण्याची गरज भासणार नाही. यामुळे सर्वांनाच दिलासा मिळाला आहे.
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ‘या’ यंत्रासाठी मिळणार कोटींचे अनुदान
आतापर्यंत सरकार टोल नाक्यावर टोल वसुली करत होते. मात्र यामध्ये प्रचंड मोठे आर्थिक नुकसान होत आहे. टोल प्लाझावर टोल भरण्यासाठी उभ्या असलेल्या गाड्यांमुळे सुमारे 1 लाख कोटी रुपयांचे तेल खर्च होत आहे. याशिवाय खूप वेळ वाहने जॅम मध्ये अडकल्याने 45 हजार कोटींचे नुकसान होते.
महत्वाची बातमी! शिंदे-फडणवीस सरकारने घेतला मोठा निर्णय
म्हणजेच टोल नाक्यावर टोल वसुली करण्याने दरवर्षी 1 लाख 45 हजार कोटींचे नुकसान होते. हे नुकसान टाळण्यासाठी सरकार जीपीएस तंत्रज्ञानाद्वारे ( GPS Technology for Toll) टोल वसूल करण्याचा निर्णय घेत आहे. या जीपीएस टोल सिस्टीम मुळे टोल प्लाझांची गरज भासणार नाही.
बिहारमध्ये आहे चक्क आयआयटीयन्सचे गाव! इथल्या तरुण पोरांची ‘ही’ कमाल नक्की वाचा
यामुळे लवकरच महामार्गावरील ( Highway) टोल प्लाझा हटवण्यात येणार आहेत. मागील वर्षीच्या संसदेच्या अधिवेशनात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी टोल प्लाझा मुळे होणाऱ्या आर्थिक नुकसानीची माहिती दिली होती. यावर उपाय म्हणून सरकार लवकरच नवीन जीपीएस यंत्रणा कार्यन्वित करणार आहे.