देशातील तरुण पिढी नशेखोर होण्याला केंद्र सरकार जबाबदार; नाना पटोले यांच्याकडून गौप्यस्फोट!

The central government is responsible for the young generation of the country becoming drug addicts; Secret explosion from Nana Patole!

भारतात दिवसेंदिवस व्यसनाधिनता वाढत चालली आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे यामध्ये तरुणांचे ( Youth ) प्रमाण जास्त आहे. भविष्यात याचे परिणाम देशाला सहन करावे लागणार यात शंका नाही. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी भाजप सरकार वर निशाणा साधला आहे. भारतातील या परिस्थितीला भाजप सरकारच जबाबदार असल्याचे मत त्यांनी मांडले आहे.

भीमा सहकारी साखर कारखाना अखेर सुरू

देशातील 50 टक्के लोकसंख्या ही तरुणांची असून ही तरुणपिढी देशाचे भविष्य आहे. परंतु, ही पिढी नशेखोर होत चालली असून देशातील 10 ते 17 वयोगटातील दीड कोटी मुले व्यसनाधीन असल्याचे प्रतिज्ञापत्र केंद्र सरकारने ( central Governmsnt) सर्वोच्च न्यायालयात सादर केले आहे. केंद्रात भाजपचे सरकार आल्यापासून ड्रग्सच्या तस्करीत वाढ झाली असून ही परिस्थिती उद्भवली आहे. अशी टीका करत नाना पटोले यांनी भाजप सरकारला धारेवर धरले आहे.

मोबाईलवर पॉर्न व्हिडिओज पाहताय तर सावधान! यांच लक्ष तुमच्यावर असतं…

तरुणपिढी नशेच्या आहारी जाणे हे देशाच्या भविष्यासाठी चांगले नाही. अंमली पदार्थांची तस्करी मागील काही वर्षांत वाढली असून गुजरातच्या मुंद्रा या खासगी बंदरात हजारो टन ड्रग्स ( Drugs) आल्याचे चित्र लपून राहिलेले नाही. या घटना वारंवार घडत आहेत. जेएनपीटी बंदर, बंगळुरू येथे देखील अशा घटना घडल्या आहेत. देशात राजरोस होणाऱ्या अंमली पदार्थांच्या तस्करीवर नियंत्रण मिळवणे सरकारला जमले नाही.

शिंदे सरकारने शेतकऱ्यांना दिला मोठा दिलासा

इतकच नाही तर महाविकास आघाडी सरकार सत्तेत असताना मुंबईमध्ये काही सेलेब्रिटींच्या घरी दोन-चार ग्रॅम गांजा सापडला असताना मुंबई नशेखोर लोकांचे शहर असल्याचे चित्र भाजपाने तयार केले होते. आता हजारो टन अंमली पदार्थांची तस्करी रोखू न शकणारे तेव्हा दोन-चार ग्रॅम गांज्यावर पेटून उठले होते. देशातील तरुण पिढी नशेच्या आहारी जाणे हा राजकारणापेक्षा देशाच्या भविष्याचा प्रश्न आहे. असे म्हणत केंद्र सरकारने तातडीने या प्रकरणात लक्ष घालावे अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे.

अ‍ॅपल युझर्ससाठी आनंदाची बातमी; Android युझर्स प्रमाणे ‘या’ सेवेचा घेता येणार लाभ

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *