मागील कित्येक वर्षांपासून सुरू असलेला महाराष्ट्र-कर्नाटक ( Maharashtra- Karnataka) सीमावाद आता नव्याने पेटला आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्रातील 40 गावे कर्नाटकात विलीन करणार असल्याचे सांगितले होते. यावरून दोन्ही राज्यात तणावाचे वातावरण होते. यापार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्राचे व कर्नाटकचे मुख्यमंत्री यांची विशेष बैठक आयोजित केली होती. या बैठकीमध्ये महाराष्ट्राची बाजू मांडण्यासाठी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस तर कर्नाटकची बाजू मांडण्यासाठी बसवराज बोम्मई आणि त्यांचे गृहमंत्रीही उपस्थित होते.
विक्रमी पीक काढल्यास शेतकऱ्यांना मिळणार 50 हजार रुपये; जाणून घ्या, काय आहे प्रक्रिया?
या बैठकीनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा ( Amit Shaha) यांनी माध्यमांशी बोलताना आपले मत व्यक्त केले. यावेळी त्यांनी कर्नाटक- महाराष्ट्र सीमावादाचा शेवट करण्यासाठी व संविधानिक मार्गाने तोडगा काढण्यासाठी बैठक बोलावली होती, असे स्पष्ट केले. यावेळी दोन्ही बाजूंनी चांगल्या वातावरणात सकारात्मक बोलणी झाली असून संविधानिक मार्गानेच तोडगा निघू शकतो असे दोन्ही बाजूंनी मान्य केले आहे. याशिवाय अमित शहा यांनी कर्नाटक- महाराष्ट्र सीमावादावर तोडगा काढण्यासाठी पंचसूत्री देखील सांगितली आहे.
”सुषमा अंधारे माकडीण…”, शिंदे गटाच्या महिलेची बोचरी टीका
दोन्ही राज्यात शांतता टिकवून ठेवण्यासाठी ही पंचसूत्री कामाला येणार आहे. यामध्ये 1) कर्नाटक-महाराष्ट्र सीमावादावर सर्वोच्च न्यायालय निर्णय देत नाही, तोपर्यंत कुणीही एकमेकांच्या राज्यावर दावा सांगणार नाही. 2) दोन्ही राज्यातील 3-3 असे सहा मंत्री एकत्र येऊन यावर चर्चा करतील. 3) शेजारील राज्यांच्या छोट्या- मोठ्या वादांवर हीच समिती तोडगा काढेल. 4) दोन्ही राज्यातील कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती सामान्य राहण्यासाठी वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती तयार करण्यात येईल. 5) मोठ्या नेत्यांच्या नावाने बनावट ट्विटर खाते तयार करून अफवा पसरवणाऱ्या खात्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात येईल. या पाच सूत्रांचा समावेश आहे.
उद्या महाविकास आघाडीच्या महामोर्चाला देवेंद्र फडणवीस यांनी दिली परवानगी