
अभिनेता शाहरुख खान याचा ‘पठाण’ ( Pathan) चित्रपट मागील काही दिवसांपासून चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटातील ‘बेशरम रंग’ हे गाणे रिलीज झाले आहे. या गाण्यात दीपिका पदुकोण हिने परिधान केलेल्या कपड्यांवरून चांगलाच वाद निर्माण झाला होता. या गाण्यात दीपिका पदुकोण ( Dipika Padukon) भगव्या रंगाच्या बिकनीमध्ये दिसत आहे. यामुळे वाद निर्माण होऊन या गाण्याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयाच्या वकिलांनी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडे ( Information & Broadcasting Ministry) धाव घेतली आहे.
या नवीन वादामुळे शाहरुख खानचा पठाण चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. सर्वोच्च न्यायालयाचे वकील विनीत जिंदाल (Vinit Jindal) यांनी गुरुवारी ( दि. 15) माहिती व प्रसारण मंत्रालयाला पत्र लिहिले आहे. तसेच या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन अयोध्येतील हनुमान गढीचे महंत राजू दास यांनी केले आहे. राजू दास यांनी व्हिडीओ शेअर करत ” ज्या चित्रपटगृहांमध्ये पठाण दाखवला जाईल, त्या चित्रपटगृहांना लोकांनी आग लावावी.” असे लोकांना सांगितले आहे.
“हसावे का रडावे कळत नाही…”, महामोर्चाच्या पार्श्वभूमीवर जितेंद्र आव्हाडांचं ट्वीट चर्चेत
या व्हिडिओमध्ये हनुमान गढीचे महंत राजू दास यांनी शाहरुख खानवर गंभीर आरोप केले आहेत. शाहरुख खानने याआधी अनेकदा हिंदू धर्माचा अपमान केला असल्याचा आरोप यामध्ये करण्यात आला आहे. बॉलिवूड व हॉलीवूड मध्ये नेहमीच सनातन धर्माची खिल्ली उडवली जात असल्याचे सांगत राजू दास यांनी दीपिका पदुकोनने भगव्या बिकीनीचा केलेला वापर निंदनीय आहे, असे म्हंटले आहे.
बदनामीच्या रागातून वडिल व काकांकडून मुलीची हत्या; स्वतःच्या हाताने सरण रचून जाळले