
मुंबई: राज्यात महापुरुषांबद्दल वक्तव्य करून चर्चेत येण्याचे सत्र सुरू असल्याचे पहायला मिळते. मागील काही दिवसांत भाजपच्या महत्त्वाच्या व मोठया नेत्यांनी चुकीची वक्तव्ये करत महापुरुषांचा अपमान केला आहे. या पार्श्वभूमीवर आज मुंबई येथे महाविकास आघाडीचाच्या महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी बोलताना संजय राऊत यांनी शिंदे सरकारवर जोरदार टीका केली आहे.
बिग ब्रेकिंग! शिंदे सरकार कोसळणार?; ‘या’ बड्या नेत्याचा दावा
राऊतांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांच्यावर देखील सडकवून तिला केली आहे. ते म्हणाले, ” राज्यपाल कोश्यारी यांना एक मिनिटं सुद्धा खुर्चीवर बसण्याच्या अधिकार नाही”. पुढे राऊत म्हणाले, “महापुरुषांचा अपमान करणारे मंत्रालयामध्ये बसले आहेत हा महाराष्ट्राचा सर्वात मोठा अपमान आहे”.
भाजपच्या मंत्र्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचा अधिकार नाही; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
त्याचबरोबर संजय राऊत (Sanjay Raut) पुढे म्हणाले, शिंदे-फडणवीस सरकार फेब्रुवारी महिना पाहणार नाही, ते लवकरात लवकर कोसळणार आहे. असं त्यांनी म्हणत भाजपसारखा मुर्ख पक्ष आजपर्यंत पाहिला नाही, अशी टीका देखील त्यांनी यावेळी केली आहे.
सरपंच पदासाठी सासू विरुद्ध सून अशी लढत; कोण बाजी मारणार? याकडे सर्वांचे लक्ष