पगार ही सामान्य माणसासाठी अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. मोठ्या पदावर असलेल्या व्यक्तींच्या पगाराबाबत आपल्याला कायम उत्सुकता असते. वैयक्तिक आयुष्यात ते कसे, कोणासोबत व कुठे राहतात याबद्दल माहिती घ्यायला लोकांना आवडते. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पगाराबद्दल (Prime Minister’s sallary) देखील तुमच्या मनात प्रचंड उत्सुकता असेल? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेवर, राहण्या-खाण्यावर आणि फिरण्यावर भरपूर खर्च होतो. इतकच नाही तर मोदींना चांगला मोठा व गलेलठ्ठ पगार सुद्धा मिळतो.
उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे येणार आमने-सामने; हिवाळी अधिवेशनात येणार वादळ?
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi) यांना देशाच्या संविधानाच्या कलम 75 नुसार दर महिन्याला मोठ्या रकमेचा पगार दिला जातो. प्रत्येक महिन्याला 1,60,000 रुपये इतका पगार ते घेतात. मात्र या पगाराव्यतिरिक्त आणखी अनेक सुविधा नरेंद्र मोदी यांना मिळतात. या सुविधांचा खर्च भारत सरकार उचलते. इतर सोयीसुविधा पूर्ण करण्यासाठी नरेंद्र मोदींना रोजचा 62000 रुपये इतका भत्ता मिळतो.
पट्ठ्याने कमालच केली! लाल केळीचा यशस्वी प्रयोग, लाखोंचं उत्पन्न
पंतप्रधानांना संसदीय भत्ता म्हणून 96,000 रुपये दरवर्षी दिले जातात. तसेच प्रवास भत्ता म्हणून नरेंद्र मोदींना दररोज 4500 रुपये दिले जातात. एवढंच नाही तर खासदार निधी म्हणून त्यांना 5 कोटी रुपये उपलब्ध होतात. महत्त्वाची गोष्ट म्हणजे पंतप्रधानांना अतिरिक्त सुविधांसाठी 60,000 रुपये दिले जातात. याशिवाय पंतप्रधानांना राहण्यासाठी आलिशान घर देखील दिले जाते. सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी 7 लोककल्याण मार्गावर आलिशान बंगल्यात राहतात. या बंगल्यात सुविधांसोबतच सुरक्षा व्यवस्थेकडे सुद्धा लक्ष दिले जाते. तसेच येथे काम करणाऱ्या कामगारांसाठी वेगळा भत्ता दिला जातो.
शेतकऱ्यांना मालामाल करणारी ‘ही’ हळद तुम्हाला माहीत आहे का? प्रति हेक्टरी निघते लाखो रुपयांचे उत्पादन