“शांत झोपलेल्या वाघाला नडला अन् क्षणातचं…”, पाहा व्हायरल व्हिडीओ

Watch the viral video "Shanta Vaghala Nadla And Moments..."

सोशल मीडिया हे आजच्या काळातील मनोरंजनाचे सर्वात मोठे साधन आहे. इन्स्टाग्राम, फेसबुक व युट्युबवर लोकांना व्हिडीओज पहायला प्रचंड आवडते. यामध्ये दररोज कितीतरी व्हिडिओ असतात. परंतु, काही व्हिडिओ लोकांच्या पसंतीस उतरुन व्हायरल होतात. अगदी असाच एक व्हिडिओ सध्या अनेक लोक पाहत आहेत. वाघ आणि कुत्रा यांचा हा व्हिडीओ असून या व्हिडिओमध्ये वाघ अतिशय थरारक पद्धतीने कुत्र्याची शिकार करताना पहायला मिळत आहे. या व्हिडीओला सोशल मीडियावर चांगलीच प्रसिद्धी ( Viral video) मिळाली असून यावर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.

पट्ठ्याने कमालच केली! लाल केळीचा यशस्वी प्रयोग, लाखोंचं उत्पन्न

व्हायरल झालेल्या हा व्हिडीओ रणथंभौर नॅशनल पार्कमधील आहे. या नॅशनल पार्कमध्ये एक कुत्रा शांत झोपलेल्या वाघाजवळ गेला. तिथं जाऊन तो मोठमोठ्याने भुंकू लागला. यावेळी वाघाने क्षणाचाही विलंब न लावता कुत्र्याची मान पकडून शिकार केली. ( Tiger Attacks on dog) ही थरारक घटना कॅमेरात कैद झाली आहे. एका पर्यटकाने वाईल्ड सफारी करताना हा व्हिडीओ काढला असून आयआरएस अधिकारी ( IRS officer) अंकुर रॅप्रिया यांनी हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे.

शेतकऱ्यांना मालामाल करणारी ‘ही’ हळद तुम्हाला माहीत आहे का? प्रति हेक्टरी निघते लाखो रुपयांचे उत्पादन

व्हिडीओमध्ये वाघाने अगदी क्षणात कुत्र्याची केलेली शिकार अतिशय थरारक वाटते. यामध्ये आजूबाजूला असणाऱ्या लोकांचा देखील आवाज येत आहे. ही थरारक शिकार पाहून घाबरलेले लोक कार चालकाला कार तातडीने मागे घेण्यासाठी सांगत आहेत. अंगावर अक्षरशः शहारे आणणारा हा व्हिडीओ पाहून सोशल मीडियावर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत.

उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे येणार आमने-सामने; हिवाळी अधिवेशनात येणार वादळ?

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *