राज्यातील काही 7 हजार 135 गावांमध्ये ग्रामपंचायत ( Grampanchayat Election 2022) निवडणूका जाहीर झाल्या होत्या. यापार्श्वभूमीवर काल बहुतेक ठिकाणी मतदान प्रक्रिया पार पडली. दरम्यान मतदानाचा हक्क बजावण्यासाठी एक दाम्पत्य चक्क दुबई वरून बारामतीला ( Dubai to Baramati) आले होते. यासाठी त्यांनी तब्बल 80 हजार रुपये मोजले आहेत. मतदानाचा हक्क पूर्ण करण्यासाठी एवढ्या लांबून हजारो रुपये खर्च करून आलेल्या या जोडीबद्दल सध्या अख्ख्या महाराष्ट्रात चर्चा सुरु आहे.
त्याच झालं असं की, बारामती तालुक्यातील गडरवाडी या गावातील सचिन गोकुळ लकडे हे आपल्या पत्नीसह दुबईमध्ये राहतात. दुबई येथील शा विमानतळावर ते काम करतात. मात्र गदरवाडी येथील 2022 च्या ग्रामपंचायत निवडणूकीमध्ये मतदान ( Voting) करण्यासाठी ते खास दुबईवरून भारतात आले. आपल्या गावाची धुरा योग्य व्यक्तीच्या हाती असावी, गावाला योग्य सरपंच भेटावा यासाठी सचिन लकडे हे काल मतदान केंद्रावर सपत्नीक उपस्थित होते.
“शांत झोपलेल्या वाघाला नडला अन् क्षणातचं…”, पाहा व्हायरल व्हिडीओ
दरम्यान राज्यभरातील 7 हजार 135 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये ग्रामपंचायत सदस्यपदांसह थेट सरपंचपदासाठी मतदान पार पडले. निवडणूक आयोगाच्या प्राथमिक अंदाजानुसार काल सरासरी 74 टक्के मतदान झाले. यामध्ये काही गावांमध्ये बिनविरोध निवडणूक पार पडल्याचे सांगितले जात आहे. या सर्व ठिकाणी 20 डिसेंबर 2022 रोजी मतदान मोजणी होणार आहे.
शेतकऱ्यांना मालामाल करणारी ‘ही’ हळद तुम्हाला माहीत आहे का? प्रति हेक्टरी निघते लाखो रुपयांचे उत्पादन