मुलगा पत्ते खेळताना सापडला वडिलांना अन् वडिलांनी बेदम मारला; पाहा VIDEO

The son found his father playing cards and the father killed him; Watch the VIDEO

‘लहान मुले म्हणजे देवाघरची फुले’ हे वाक्य फक्त बोलण्यासाठीच छान वाटते. कारण, लहान मुले निरागस असली तरी प्रचंड दंगेखोर असतात. एखादी गोष्ट त्यांना करायला सांगितली तर त्याच्या अगदी उलट ते वागतात. या वयात त्यांना खेळायला खूप आवडते. त्यामुळे घरच्यांनी कितीही नकार दिला तरी नजर चुकवून ते खेळायला जातात आणि मजा मस्ती करतात. तसं पहायला गेलं तर लहान मुलांचे वयच मुळात हसण्या-बागडण्याचे असते. परंतु, तरीदेखील पालक त्यांच्यावर दबाव आणत असतात.

मतदानासाठी थेट दुबईमधून बारामतीत आली ‘ही’ जोडी; गावाला चांगला सरपंच मिळावा म्हणून पार पाडले कर्तव्य

ग्रामीण भागात तर हा दबाव इतका असतो की मुलांना चक्क मारले जाते. सध्या अशाच आशयाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ( Viral video ) यामध्ये एका लहान मुलाला त्याचे वडील बेदम मार देत आहेत. खरंतर हा मुलगा घरात न सांगता मित्रांच्यात निवांतपणे पत्ते खेळताना त्याच्या वडिलांना दिसतो. यावेळी त्याचे वडील रागात त्याला चक्क चप्पलने मारू लागतात. ( Father hits to his son)

“शांत झोपलेल्या वाघाला नडला अन् क्षणातचं…”, पाहा व्हायरल व्हिडीओ

ट्विटरवर @HasnaZarooriHai या आयडी वरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये ‘वडिलांचं हे असं प्रेम आजकाल संपुष्टात आलंय.’ असे गमतीदार कॅप्शन देण्यात आले आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘याच प्रेमाने योग्य मार्ग दाखवला आहे.’ अशा प्रतिक्रिया या व्हिडिओवर आल्या आहे.

नरेंद्र मोदींना किती पगार मिळतो तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या पंतप्रधानांच्या आर्थिक उत्पन्नाबद्दल सविस्तर माहिती

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *