अधिवेशनात ‘हे’ नवीन विधेयक मांडले जाणार; राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय!

'This' new bill will be introduced in the session; The state government has taken a big decision!

राज्यात आजपासून नागपूर येथे हिवाळी अधिवेशनास ( Winter session 2022) सुरुवात होत आहे. या पार्श्वभूमीवर काल राज्यमंत्रीमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde) यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित होते. या बैठकीमध्ये काही मोठे व महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. याबाबतची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. राज्य मंत्रिमंडळाने या हिवाळी अधिवेशनात लोकायुक्तीचा कायदा लागू करण्याबाबत पुढचं पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला आहे.

मुलगा पत्ते खेळताना सापडला वडिलांना अन् वडिलांनी बेदम मारला; पाहा VIDEO

“नुकतीच मंत्रिमंडळाची बैठक पार पडली असून दोन महत्त्वाचे निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतले आहेत. ज्याप्रकारे केंद्रात लोकपालाचं विधेयक झालं त्याच प्रकारे महाराष्ट्रात लोकपाल आणि लोकायुक्ताचा कायदा झाला पाहिजे. अशी मागणी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे ( Anna Hajare) सातत्याने करत होते. यावर आता शिंदे- फडणवीस सरकारने ठोस पाऊले उचलली आहेत.” असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माध्यमांशी बोलताना म्हणाले.

मतदानासाठी थेट दुबईमधून बारामतीत आली ‘ही’ जोडी; गावाला चांगला सरपंच मिळावा म्हणून पार पाडले कर्तव्य

अण्णा हजारे यांनी केलेल्या मागणीनंतर भाजप-सेना युतीचे सरकार असताना एक समिती स्थापन करण्यात आली होती. मात्र हे सरकार गेल्यानंतर महाविकास आघाडीच्या कार्यकाळात यावर काही काम झाले नाही. दरम्यान शिंदे- फडणवीस सरकारने या समितीला पुन्हा एकदा चालना दिली आहे. या समितीने दिलेला रिपोर्ट शासनाने पूर्णपणे स्वीकारला असून त्यानुसार लोकायुक्त कायद्याच्या विधेयकाला ( Lokayukt Law Bill) मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.

“शांत झोपलेल्या वाघाला नडला अन् क्षणातचं…”, पाहा व्हायरल व्हिडीओ

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *