शेती हा निसर्गावर चालणारा व्यवसाय आहे. यामुळे शेतकऱ्यांना नैसर्गिक संकटांमुळे बऱ्याचदा नुकसान सहन करावे लागते. दरम्यान राज्यात परतीच्या पावसामुळे शेतीचे नुकसान झाले आहे. यामुळे अगदी शेवटच्या टप्प्यात असणारे पीक मातीमोल झालेले पहायला मिळत आहे. यामध्ये शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका देखील बसलाय. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते अजित पवार ( Opposition leader Ajit Pawar) यांनी राज्यात ओला दुष्काळ जाहीर करुन मदत करण्याची मागणी शिंदे- फडणवीस सरकारकडे केली आहे.
ब्रेकिंग: मुंबई हायकोर्टाचा गायरान जमीन अतिक्रमणाबाबत मोठा निर्णय
एका मागोमाग येत गेलेल्या नैसर्गिक संकटांमुळे जवळजवळ सगळ्याच हंगामात शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागत आहे. यामुळे शेतकऱ्यांवर अक्षरशः कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे याचा परिणाम म्हणून शेतकरी आत्महत्येकडे वळू लागले आहेत. शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी राज्य सरकारने ( state governent) प्रयत्न करायला हवेत. याबाबत अजित पवारांनी सरकारची कानउघडणी केली आहे.
शिक्षक की राक्षस! चौथीच्या विद्यार्थ्याला पहिल्या मजल्यावरून दिलं खाली फेकून
अतिवृष्टीने ( heavy rainfall) राज्यातील विविध भागांतील पीके वाहून गेली. यामध्ये शेतजमिनी खरवडून गेल्याने नापिक झाल्या आहेत. तसेच पशुधन वाहून गेल्याने आर्थिक नुकसान झाले आहे. या अतिवृष्टीमुळे यंदाच्या वर्षी खरिपाबरोबर रब्बीचा हंगाम सुद्धा वाया गेला आहे. दरम्यान कापूस, सोयाबीन, ज्वारी, बाजरी, तीळ, मका, उडीद, मूग, तूर, धान, संत्रा या महत्त्वाच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. विमा कंपन्यांकडून शेतकऱ्याची पिळवणूक होत असल्याचे खरीप हंगामात दिसून आले. यामध्ये पीक विम्याचे दावे मोठ्या प्रमाणावर नाकारण्यात आले असून प्रलंबित दाव्यांची संख्याही मोठी आहे. यामुळे आता सरकारनेच पुढाकार घेऊन शेतकऱ्यांना मदत करायला हवी.