आजकाल सोशल मीडियाचा वापर प्रचंड प्रमाणात वाढला आहे. यामुळे दिवसेंदिवस सायबर क्राईमच्या गुन्ह्यात वाढ होताना दिसत आहे. पुण्यात नुकतेच एका तरुणीचे नग्न फोटो सोशल मीडियावर ( Social Media) व्हायरल होण्याची घटना घडली आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे या तरुणीच्या प्रियकरानेच ही गोष्ट केली आहे. या प्रकरणी तरुणीने तिच्या प्रियकराविरुद्ध स्वतः स्वारगेट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
इंदुरीकर महाराजांच्या घरी गुलाल ! कुटुंबातील ‘ही ‘ व्यक्ती झाली सरपंच
त्याच झालं असं की, फिर्यादी व आरोपी यांची ऑक्टोंबर 2021 मध्ये इन्स्टाग्रामवर ( Instagram) ओळख झाली होती. हळूहळू ही ओळख वाढत गेली व ओळखीचे प्रेमात रूपांतर झाले. दरम्यान आरोपीचे काही अश्लील फोटो आपल्या मोबाईल मध्ये काढले होते. काही दिवसांनी या दोघांमध्ये वाद झाल्यानंतर जेव्हा तरूणीने आरोपीला भेटण्यासाठी नकार दिला तेव्हा आरोपीने तिला न्यूड फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. भेटण्याची जबरदस्ती करून देखील तरुणी ऐकत नाही म्हंटल्यावर आरोपीने हे अश्लील फोटो तिच्या कुटुंबियांच्या मोबाईलवर पाठवले.
यानंतर मुलींच्या कुटुंबातील व्यक्तींनी पोलीस स्टेशन मध्ये धाव घेत तक्रार दाखल केली. ज्ञानेश्वर बाळू सितापे असे या आरोपीचे नाव आहे. काही दिवसांपूर्वी देखील अशीच घटना घडली होती. यामध्ये ब्रेकअप झाल्यानंतर प्रियकराने तरुणीचा नग्न फोटो (Nude Photo) स्टेटसवर ठेवण्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. यावेळी या प्रियकरावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला होता.
राष्ट्रपतींना मिळतो लाखोंचा पगार; जोडीदारासाठी सुद्धा दिल्या जातात ‘या’ खास सुविधा!