कर्जत: महाराष्ट्रातील जवळपास 7 हजार 135 गावांमध्ये ग्रामपंचायत निवडणूका जाहीर झाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर काल बहुतेक ठिकाणी निकाल जाहिर झाले. या निवडणूकांमध्ये राज्यातील प्रमुख राजकिय पक्षांमध्ये चांगलीच चुरस लागली होती. यामुळे सगळ्यांनाचेच निकालाकडे लक्ष लागले होते. दरम्यान कर्जत तालुक्यातील तालुक्यातील बहिरोबावाडी-पठारवाडी गट ग्रामपंचायतीच्या निवडणूकीमध्ये कोमल शरद यादव यांची थेट जनतेतून सरपंचपदी निवड झाली आहे.
ब्रेकिंग! कोरोना पुन्हा वाढला; देशात 131 नवे कोरोनाबाधित
बहिरोबावाडी-पठारवाडी गट ग्रामपंचायतीमध्ये सहा सदस्यांची बिनविरोध निवडणूक झाली होती. तर उर्वरित तीन सदस्य व सरपंच पदासाठी नुकतीच मतदान प्रक्रिया पार पडली. यामध्ये कोमल शरद यादव यांनी 1299 मतांनी विजय मिळवून सरपंच पद मिळवले आहे. यामध्ये ज्योती ज्ञानदेव लष्करे यांचा पराभव झाला आहे.
या निवडणुकीत गावातील नेत्यांनी एकत्र येऊन विजय मिळवला आहे. अंकुशराव यादव, बळीराम यादव, विजय तोरडमल, पांडुरंग तांदळे व इतर नेत्यांनी एकत्र येऊन हा विजय मिळवला आहे. एकीने कुठलीही गोष्ट साध्य करता येते हे या नेत्यांनी दाखवून दिले आहे. विजय झाल्याच्या पार्श्वभूमीवर विजयी उमेदवारांवर गुलाल उधळत गावामध्ये आनंद व्यक्त करण्यात आला आहे.
हिवाळ्यात साताऱ्यात ट्रिप प्लॅन करताय, तर ‘ही’ ठिकाणे विसरू नकाच!