पुण्यात मागील काही दिवसांपासून रात्री अपरात्री लूट करणे, राजरोस महिलांच्या अंगावरील दागिने हिसकावने, कोयता दाखवून दहशत माजविणे, लुबाडणूक करणे असे प्रकार मोठ्या प्रमाणात घडत आहेत. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी अधिवेशनात प्रश्न उपस्थित करून ट्विट केले आहे. यामध्ये त्यांनी कोयता गँगवर ( Koyta Gang) पोलिसांकडून कठोर कारवाई करण्यात यावी, असे सांगितले आहे.
ब्रेकिंग! कोरोना पुन्हा वाढला; देशात 131 नवे कोरोनाबाधित
कोयता गँगचे वाढते कारनामे रोखण्यासाठी आणि राज्यात कायदा व सुव्यवस्था राखली जावी यासाठी पोलिसांकडून कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच या गँगच्या गुन्हेगारांची दहशत कोणत्याही परिस्थितीत मोडून काढण्यासाठी त्यांना तडीपार करा किंवा त्यांच्यावर मोका लावा. असे ट्विट अजित पवार यांनी केले आहे. याखाली त्यांनी #हिवाळीअधिवेशन२०२२ ( Winter session 2022) असा हॅशटॅग देखील टाकला आहे.
पुण्यात मांजरी बुद्रुक, गंगानगर, मुंढवा रस्ता, हडपसर, भेकराईनगर या भागात कोयता गँगने धुडगूस घातला आहे. त्यांच्या सततच्या मारामाऱ्या, तोडफोड, चोऱ्या, गाड्यांची मोडतोड यामुळे नागरिक दहशतीखाली जगत आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोयता गँग मध्ये अल्पवयीन मुलांचाच जास्त समावेश आहे. अजित पवार (Ajit Pawar) यांच्या ट्विटनंतर पुणे शहर आणि इतर भागात पोलिसांनी कसून चौकशी सुरू केली आहे.
हिवाळ्यात साताऱ्यात ट्रिप प्लॅन करताय, तर ‘ही’ ठिकाणे विसरू नकाच!