अभिनेत्री केतकी चितळे ( Ketki Chitle) तिच्या सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावरील बेधडक वक्तव्यांमुळे केतकी चितळे नेहमीच वादात अडकते. आता देखील राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadanvis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यावर निशाणा साधत केतकीने इन्स्टाग्रामवर पोस्ट केली आहे. ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे.
गायरान जमीन म्हणजे नेमके काय? वाचा याबद्दल सविस्तर माहिती
अमृता फडणवीस यांनी एका कार्यक्रमात बोलताना नरेंद्र मोदी यांना देशाचे राष्ट्रपिता म्हंटले होते. “भारताला दोन राष्ट्रपिता आहेत. महात्मा गांधी हे जुन्या भारताचे राष्ट्रपिता आहेत, तर नरेंद्र मोदी हे नवीन भारताचे राष्ट्रपिता आहेत. अमृता फडणवीस यांच्या या वक्तव्यानंतर त्या वादाच्या भोवऱ्यात अडकल्या होत्या. यावेळी लोकांनी त्यांच्यावर टीका केली होती.
धक्कदायक! सिक्कीममध्ये लष्कर गाडीचा अपघात होऊन १६ भारतीय जवानांचा मृत्यू
दरम्यान अमृता फडणवीस यांच्या याच वक्तव्यावरून केतकीने नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला आहे. इंस्टाग्रामवर पोस्ट करत तिने अमृता फडणवीस यांना चांगलेच सुनावले आहे. यामध्ये तिने मध्ये लिहिलं आहे की, जुनं आणि नवं यावरून जे काही समोर येत आहे ते जुनं झालं आहे. जसं की नवीन राष्ट्रपिता हा वाद आता जुना झाला आहे. आपला देश प्रत्येक सेंकदाला बदलत आहे. त्यामुळे आपणही आता स्वत:ला बदलण्याची वेळ आली आहे. सध्या तीन हजार वर्षे प्राचीन गोष्टींची व्याख्या करायची झाल्यास ती शंभर वर्षांची झाली आहे, असंही केतकीने या पोस्टमध्ये लिहिले आहे.
कोरोनाने घातले थैमान! राज्यातील अनेक प्रसिद्ध मंदिरात आजपासून मास्क सक्ती